अनाथ, वंचित मुलांकडून डॉ. लव्हटे यांचा रविवारी गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनाथ, वंचित मुलांकडून 
डॉ. लव्हटे यांचा रविवारी गौरव
अनाथ, वंचित मुलांकडून डॉ. लव्हटे यांचा रविवारी गौरव

अनाथ, वंचित मुलांकडून डॉ. लव्हटे यांचा रविवारी गौरव

sakal_logo
By

अनाथ, वंचित मुलांकडून
डॉ. लव्हटे यांचा रविवारी गौरव
कोल्हापूर, ता. ३ ः अनाथ, वंचित मुलांसाठी आयुष्य समर्पित करणारे डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा कृतज्ञता सोहळा रविवारी (ता. ६) होणार आहे. वंचित स्नेहीजन सद्‌भाव समितीतर्फे हा कृतज्ञता सोहळा होईल. अनाथ, वंचित मुलांनी एकत्रित येऊन डॉ. लवटे यांचा गौरव करणार आहेत, अशी माहिती आयोजक अध्यक्ष सुभाष नारे यांनी पत्रकाद्वारे दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीकांत देशमुख असतील. या वेळी कृषी परिषद, पुणेचे अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल विनोदकुमार लोहिया, अमीर भाई भयाणी उपस्थित राहतील. रविवारी दुपारी ४ वाजता राम गणेश गडकरी हॉल येथे हा कार्यक्रम होईल. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष भूषण बापट यांनी केले आहे. सचिव गुरुप्रसाद पाटील, खजिनदार अर्चना बनगे-मिरजकर, कार्यवाह सागर बगाडे, सदस्य सचिन माने, सरस्वती चव्हाण, रूपाली नारे यांनी संयोजन केले आहे.