पॅचवर्कचे काम बंद पाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॅचवर्कचे काम बंद पाडले
पॅचवर्कचे काम बंद पाडले

पॅचवर्कचे काम बंद पाडले

sakal_logo
By

01428
बोन्द्रेनगर : येथे रस्त्याचे निकृष्ट काम होत असल्याचे पाहून नागरिकांनी काम बंद पाडले व ठेकेदार, अधिकारी यांना धारेवर धरले.


पॅचवर्कचे काम बंद पाडले
फुलेवाडी रिंगरोडवर निकृष्ट दर्जामुळे संताप; अखेर ठेकेदाराकडून हमी
कोल्हापूर, ता. ३ ः फुलेवाडी रिंगरोडवर पॅचवर्कचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत परिसरातील संतप्त नागरिकांनी आज सकाळी काम बंद पाडले. माजी नगरसेवक अमोल माने यांनी ठेकेदाराची औजारे भिरकावण्याबरोबर बॅरिकेडस पाडली. नागरिकांच्या संतापामुळे ठेकेदाराने पूर्ण पॅचवर्क सीलकोट करून देऊन एक वर्षाची जबाबदारी घेण्याचे आश्‍वासन दिले. दर्जाची हमी मिळाल्यानंतर नागरिकांनी काम सुरू करण्यास परवानगी दिली.
फुलेवाडी रिंगरोडवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागते. याबाबत नागरिकांनी आंदोलन सुरू केल्यानंतर महापालिकेने पॅचवर्कचे काम सुरू केले. तेही खराब दर्जाचे असल्याने संतप्त नागरिकांनी काल काम बंद पाडले. आज सकाळीही सर्व नागरिक जमले. ठेकेदारांशी वादावादी केली. माजी नगरसेवक अमोल माने यांनी संतापाने बॅरिकेडस पाडली तसेच औजारे भिरकावली. नागरिकांनी काम बंद पाडल्यानंतर उपशहर अभियंता एन. एस. पाटील आणि बाबूराव दबडे यांनी भेट दिली. ठेकेदार अरुण पाटील तसेच जुने ठेकेदार उपस्थित होते. ठेकेदारांनी पॅचवर्क करताना पूर्ण डांबरी सिलकोट करून देऊ असे सांगितले. तसेच एक वर्षाची वॉरंटी घेऊ असे आश्वासन दिले. गुणवत्तेची हमी दिल्यानंतर नागरिकांनी काम सुरू करण्यास परवानगी दिली. याबाबत अमोल माने यांनीही आंदोलन थांबवल्याचे सांगितले. यावेळी अनिल चव्हाण, संजय पाटील, समरजीत जगदाळे, सचिन कुबडे, गजानन विभुते, बी. एल. बरगे, प्रशांत पोवार, सोमनाथ नलवडे, एकनाथ पवार, पांडुरंग मोहिते उपस्थित होते.