निवृत्तीवेतनधारकांना दाखले देण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्तीवेतनधारकांना दाखले देण्याचे आवाहन
निवृत्तीवेतनधारकांना दाखले देण्याचे आवाहन

निवृत्तीवेतनधारकांना दाखले देण्याचे आवाहन

sakal_logo
By

निवृत्तीवेतनधारकांना दाखले देण्याचे आवाहन
गडहिंग्लज : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे दाखले नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक असते. ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतले जाते. त्याच बँकेच्या शाखेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून हयातीचे दाखले सादर करण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा निवृत्त कर्मचारी संघटनेचे संचालक दत्ता देशपांडे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकांनी हयातीच्या दाखल्यासोबत बँकेच्या शाखेमध्ये पासबुक, आधार कार्ड व पॅनकार्ड घेऊन जाणे गरजेचे आहे. मुदतीत हयातीचा दाखला न दिल्यास संबंधिताच्या नावापुढे अनुपस्थित असा शेरा येतो. त्यामुळे निवृत्तीवेतन कोषागार कार्यालयाकडून आदा केले जात नाही. त्यामुळे हयातीचे दाखले वेळेत सादर करावेत, असे आवाहन केले आहे.