अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर पशुसंवर्धनाचा कारभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर पशुसंवर्धनाचा कारभार
अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर पशुसंवर्धनाचा कारभार

अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर पशुसंवर्धनाचा कारभार

sakal_logo
By

अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर पशुसंवर्धनाचा कारभार
आजऱ्यातील चित्र ः कर्मचाऱ्यांवर वाढला ताण, जनावरांचे उपचाराअभावी हाल
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३ ः आजरा तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाची पदे पन्नास टक्के रिक्त आहेत. त्यामुळे निम्या पदावर या विभागाचा कारभार सुरु आहे. लम्पीमुळे या विभागातील पशुवैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ वाढली आहे. दैनंदिन कामकाजाबरोबर अन्य अनुषंगीक कामे सुरुच आहेत. त्यात लम्पीची भर पडल्याने त्याच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असून जनावरांचे वेळेवर उपचार होत नसल्याने हाल होत आहेत.
आजरा तालुका डोंगराळ व दुर्गम तालुका आहे. या तालुक्यात ९६ गावे आहेत. यामध्ये बहुतांश वाड्या वस्ती व धनगरवाडे आहेत. त्यामुळे तालुक्यातील पशुधन विविध गावात विस्तारलेले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा देण्यासाठी मर्यादा येतात. त्यांना दररोज काही किलोमीटर पायपीट करावी लागते. काही वेळा जनावरांना वेळेत उपचार न मिळाल्याने काही जनावरांचा मृत्यूही झाला आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जनावरांना वैद्यकीय सेवा पुरविताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या लम्पीमुळे पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ वाढली आहे. त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे.
तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाने ९ आहेत. यामध्ये श्रेणी - १ चे पाच दवाखाने आहेत. आजरा तालुक्यात १९९६ पासून २८ चा आकृतीबंध आहे. तो बदलेला नाही. निवृत्ती व नवी पदभरती झाली नसल्याने रिक्त पदे वाढली आहेत. सध्या या विभागाकडील १४ पदे रिक्त आहेत. कोरोनानंतर बेरोजगार तरुणांनी पशुपालनाकडे लक्ष केंद्रीत केल्यामुळे म्हैशी, गाई व कोंबड्या पालनाचे फार्म वाढले आहेत. त्यात लम्पीची भर पडली आहे. दैनंदिन कामे, लाळखुरकत, फऱ्या, घटसर्प या साथीचे लसीकरणासह अन्य कामे अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावी लागतात. रिक्त पदामुळे पशुवैद्यकीय सेवा वेळेत देणे अडचणीचे बनले आहे. सध्या पशूधन विकास अधिकाऱ्यांचे ५, पशुधन पर्यवेक्षक १, वर्णोपचारक १, परिचर ७ अशी १४ पदे रिक्त आहेत.
------------
* २०१७ पशुगणनेच्यानुसार तालुक्यातील जनावरांची संख्या
गाय व बैल- ७१६८
म्हैश व रेडे- २७८००
कोंबड्या (देशी)- ३८०००
कोंबड्या (बॉयलर, लेअर) - ५ लाख ५० हजार
बकरी - १२०००