वाचकांचा पत्रव्‍यवहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचकांचा पत्रव्‍यवहार
वाचकांचा पत्रव्‍यवहार

वाचकांचा पत्रव्‍यवहार

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

रेल्वे, विमानसेवा पूर्ववत सुरू करावी
कोल्हापूर-बंगळूर प्रवास सामान्य जनतेसाठी महाग झाला आहे. कोल्हापूरहून बंगळूरसाठी सुटणारी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस २०१९ पासून बंद झाली. ती आता मिरजहून सुटते. कोल्हापूरहून मिरजला जाण्यासाठी एकतर बसने किंवा इतर काहीतरी सोय करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राणी चन्नम्मा एक्स्प्रेस कोल्हापूरहून तत्काळ सुरू करावी. कोल्हापूर-बंगळूर विमानसेवा सुरळीत सुरू होती. पण, तीही बंद होऊन तीन वर्षे झाली. अजूनही ती सुरू होत नाही. माझाच प्रसंग मुद्दाम येथे नमूद करते. माझ्या मुलीला तिच्या दोन महिन्यांच्या बाळासह बंगळूरला जाण्यासाठी बेळगावहून विमानाने जाणे क्रमप्राप्त होते. कारण कमी वेळात बाळ नीट सुखरूप जाईल म्हणून. त्यासाठी सकाळी पावणेसातला घरातून बाहेर पडलो. साधारण निम्म्या रस्त्यात पोचलो अन् गाडीचं मागचं चाक पंक्चर झालं. निर्जन रस्ता, वेगाने जाणारी वाहने, गाडीचं चाक बदलेपर्यंत बाळ अन् आम्ही रस्त्यावरच उभे होतो. हा प्रसंग खूप भयंकर होता. मोठी माणसं असली तर ठीक; पण छोटं बाळ अन् हा प्रसंग..! सधन लोक सुखसोयी वापरून अडचणींवर मार्ग करू शकतात; पण सामान्य माणसांनी काय करावं, हा प्रश्न मनाला भेडसावत होता. म्हणून हा पत्रप्रपंच. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे व विमानसेवा पूर्ववत सुरू करावी.
सुवर्णा पाटणे-बोंगाळे, कोल्हापूर