आम्ही सेनेतून बाहेर पडल्यावर त्यांचा दंगली घडविण्याचा हेतू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही सेनेतून बाहेर पडल्यावर
त्यांचा दंगली घडविण्याचा हेतू
आम्ही सेनेतून बाहेर पडल्यावर त्यांचा दंगली घडविण्याचा हेतू

आम्ही सेनेतून बाहेर पडल्यावर त्यांचा दंगली घडविण्याचा हेतू

sakal_logo
By

आम्ही सेनेतून बाहेर पडल्यावर
त्यांचा दंगली घडविण्याचा हेतू
दीपक केसरकर; आरोप करणाऱ्यांचे ढोंग उघड करू

कोल्हापूर, ता. ३ ः शिवसेनेतून माझ्यासह ४० आमदार ज्यावेळी बाहेर पडले, त्याचा गैरफायदा घेऊन राज्यात दंगली घडवण्याचा हेतू होता, असा गौप्यस्फोट शिक्षणमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.
श्री. केसरकर सांगोलामार्गे कोल्हापुरात आले. त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘आम्ही पक्षांतून बाहेर पडल्यानंतर आमची भूमिका मनापासून मांडली. आमच्यावर झालेला अन्याय लोकांना सांगितला. ती वस्तुस्थिती मांडली. यावर लोकांनी विश्‍वास ठेवला म्हणून दंगली झाल्या नाहीत. आमच्यावर वारंवार तेच आरोप करणाऱ्यांचे ढोंग लवकरच उघडकीस आणणार आहे.’’
पक्षातून बाहेर पडल्यानंतर आमच्यावर खूप आरोप झाले. जे आमच्या पक्षात नव्हते, तेही वाट्टेल ते बोलू लागले. छोट्या छोट्या गोष्टीचे भांडवल केले गेले. ज्या गोष्टींना ते जबाबदार आहेत, त्याची जबाबदारी आमच्यावर ढकलली जात आहे. म्हणूनच आम्ही खरी माहिती राज्यासमोर आणणार असल्याचे केसरकर म्हणाले. पक्ष सोडताना नेमकी वस्तुस्थिती काय होती, हे जनतेला समजले पाहिजे, यासाठी आम्ही हे करणार आहोत, असेही ते म्हणाले.

आमदार बच्चू कडू व रवी राणा यांच्यात तडजोड झाल्यानंतरही जर त्याचा सन्मान राखला जात नसेल, तर पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. मला तो अधिकार नाही. सुषमा अंधारे यांच्याही आरोपांना मी उत्तर देणार नाही.
- दीपक केसरकर, पालकमंत्री