एसआयआयएलसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसआयआयएलसी
एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

sakal_logo
By

कोल्हापूर व सांगली आवृत्यांसाठी SIILCच्या लोगोसह ठळक वापरावी.
--------------------------------------------------

‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’
अभ्यासक्रम प्रवेश, करिअर संधी
पदवीधरांसाठी आज कोल्हापूरमध्ये विशेष सेमिनार

कोल्हापूर, ता. ३ : या किंवा गेल्या वर्षी बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीएस, बीबीए, बीई, बीटेक, बीएस्सी ॲग्री आदींपैकी कोणताही पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया व याद्वारे उपलब्ध होणाऱ्या नोकरी व व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारा विनामूल्य सेमिनार शुक्रवारी (ता. ४) कोल्हापूर सकाळ कार्यालयात आयोजिला आहे.

‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ हा एक वर्षाचा सखोल, तसेच इंडस्ट्रींनी आखलेला अभ्यासक्रम आहे. ज्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात काही व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा आहे वा चांगला जॉब मिळवायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविणारा हा प्रोग्राम आहे. सेमिनारमध्ये कोर्सच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, कालावधी, विषय तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरमध्ये कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याविषयी मार्गदर्शन होईल. सेमिनार मोफत असून यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

--------चौकट करावी-------
सेमिनार वार आणि तारीख ः शुक्रवार, ४ नोव्हेंबर २०२२
वेळः दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत
सेमिनारचे ठिकाणः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिरजवळ, कोल्हापूर
नावनोंदणीसाठी संपर्कः ९१४६०३८०३१