कोल्हापूर रस्ते प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर रस्ते प्रश्न
कोल्हापूर रस्ते प्रश्न

कोल्हापूर रस्ते प्रश्न

sakal_logo
By

कोल्हापूर शहरातील रस्त्याचा प्रश्न गंभीर स्वरूप का धारण करतो?
कोल्हापूर महापालिका रस्ते करताना कंत्राटदाराला सर्व अटी घालत असते. परंतु, रस्ता करीत असताना त्याचा दर्जा चांगला राहण्यासाठी शास्त्रीय आधार घेतात की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत असतो, तोच प्रश्न प्रशासनाला पडतो का नाही? त्याचे कारण ‘आयआरबी’ने कोल्हापूर शहरातील रस्ते केले होते, तेव्हा याविषयी तक्रार करूनही लक्ष दिले नाही. ते पुढीलप्रमाणे ः
सर्वांत महत्त्वाचे रस्ता करताना मधील भाग उंच असावा लागतो व दोन्ही बाजूंना उतार (स्लोप) असावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर पाणी साठत नाही व खड्डे पडत नाहीत. सांडपाणी जाण्यासाठी गटार असावे लागतात. गटारातून पाणी सहज जाण्यासाठी (कर्व्ह) स्लोप ठेवावा लागतो. गटारातील पाणी निर्गत होण्यासाठी त्यांचे भूसलगता ठेवावे लागते. चौकोनी गटार असता कामा नये, याविषयी आम्ही वारंवार मांडणी केली आहे. परंतु, ‘आयआरबी’ने रस्त्याची गटार चौकोनी आकार व भूसलगता कुठेही ठेवली नाही. या प्रश्नामुळे चौकाचौकांत पाणी साठत असते, याकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले आहे.
आता रस्ते करण्यासाठी घरांच्या प्लॉटच्या खाली रस्ता असावा लागतो. आपण पाहिले तर हे रस्ते प्लॉटच्या वर केल्याने घरात पाणी जात आहे, याकडेही अद्याप दुर्लक्ष केले आहे. नागरिकांचे पैसे अशा तऱ्हेने उधळपट्टी करणे योग्य नाही. यापूर्वी सन १९८० मध्ये रिक्षाचालकांनी घेराओ घातला होता. त्या वेळी अगदी कमी खर्चात उत्तमरीत्या रस्ते करण्याचे काम रेनोल्ड कंपनीने केले होते. ते रस्ते तीन वर्षे खराब झाले नव्हते, याची माहिती तरी प्रशासनाकडे आहे काय?
आता तरी रस्ते करीत असताना किमान शास्त्रीय दृष्टिकोनाचा विसर पडणार नाही, याची काळजी घेणार काय? ज्यांना याची कल्पना आहे, त्यांनी स्वतः पुढे होऊन कामात लक्ष घालण्याची गरज आहे. कोल्हापुरात पाण्याचे पाईप घालत असताना ही खबरदारी घ्यावी म्हणून प्रयत्न केले गेले. ते काम होते बावडा फिल्टर हाउस ते कावळा नाक्याचे (महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन). दोशी यांनी ते केले आहे. त्या वेळी आम्ही पाईप जोडणीचे काम किती काळजीपूर्वक करीत होते, ते पाहिले आहे. आपण पाहाल तर आजपर्यंत एक गळती किंवा व्हॉल्व्ह खराब झाला नाही. मग आपण असे दर्जेदार काम करणाऱ्यांची निवड का करीत नाही, निसर्गाला दोषी का धरता, हे पाहणे गरजेचे आहे. डॉ. आर. व्ही. भोसले यांनी पूर्वी सर्व्हे सिटीझन कमिटी केली होती. तशी तज्ज्ञांसहीत योग्य कार्यकर्त्यांची कमिटी परत कोणी तज्ज्ञ करू शकेल का? याकडे लक्ष दिले पाहिजे.
- दिलीप पवार