आदिनाथ बँकेची निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिनाथ बँकेची निवडणूक बिनविरोध
आदिनाथ बँकेची निवडणूक बिनविरोध

आदिनाथ बँकेची निवडणूक बिनविरोध

sakal_logo
By

आदिनाथ बँकेची निवडणूक बिनविरोध
इचलकरंजी, ता. ४ ः येथील श्री आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १५ जागांसाठी १५ अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक प्रेमदास राठोड यांनी याबाबतची घोषणा केली. मुख्य कार्यकारी अधिकारी जे. बी. चौगुले उपस्थित होते. नूतन संचालक मंडळात नव्या सहा चेहऱ्यांना संधी दिली आहे.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे कामकाज सुरू आहे. बँकेच्या स्थापनेपासून दिवंगत आप्पासाहेब मगदूम यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार आवाडे, स्वप्निल आवाडे यांनी विशेष प्रयत्न केले. नूतन संचालकांचा राठोड यांच्याहस्ते सत्कार केला. नूतन संचालक असे ः सुभाष काडाप्पा, बाळासाहेब केटकाळे, कुंतिलाल पाटणी, बाळासाहेब चौगुले, मधुकर मणेरे, चंद्रकांत मगदूम, अभयकुमार ऊर्फ राजू मगदूम, सुदर्शन खोत, श्रेणीक मगदूम, अनिल बम्मण्णावर, मंगल देवमोरे, अनिता चौगुले, संपत कांबळे, गुरुनाथ हेरवाडे व सुकुमार पोते.