गगनबावडा पर्यटकांनी फुलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनबावडा पर्यटकांनी फुलला
गगनबावडा पर्यटकांनी फुलला

गगनबावडा पर्यटकांनी फुलला

sakal_logo
By

60212
गगनबावडा : सुट्यामुळे गगनबावडा परिसरात झालेली पर्यटकांची गर्दी.


गगनबावडा पर्यटकांनी फुलला
सुट्यांमुळे वर्दळ वाढली; गुलाबी थंडीचा अनुभव, व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’
गगनबावडा, ता. ८ : गगनबावडा परिसर दिवाळी सुट्यामुळे पर्यटकांनी फुलला आहे. ‘प्रति महाबळेश्‍वर’ म्हणून गगनबावड्याचा उल्लेख केला जातो. थंडी पडू लागल्याने आणि सुट्यांमुळे गुलाबी थंडी अनुभविण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. कोकणाला जोडणारा दुवा करूळ व भुईबावडा घाट या दोन्ही घाटांमुळे गोवा, सिंधुदुर्ग यासह कोकण दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची येथे रीघ आहे.
गगनबावड्यातील निसर्ग सौंदर्यात भर घालणारे लखमापूर, अणदूर, कोदे, वेसरफ या ठिकाणी असणारे तलाव पर्यटकांना भुरळ घालत आहेत. पाण्याने भरलेले तलाव, सभोतालची हिरवळ, गर्द झाडी, कट्टे, मनसोक्त पोहणे त्यामुळे तलावांच्या ठिकाणी सहकुटुंब सहली आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे तलावाजवळ पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येत आहेत.
गगनबावड्यातील गगनगिरी महाराजांच्या गगनगिरी मठावरून (गगनगड) कोकण दृश्य टिपण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. पळसंबे येथील शांत वातावरणातील ‘रामलिंग मठ’ (पुरातन लेणी) पुरातन पांडवकालीन काळाची आठवण करून देतात. सांगशी येथील पाचव्या शतकातील चालुक्यकालीन शिलालेख एक प्रेम कहानी आहे. बोरबेट येथील मोरजाई व वेताळ माळ येथील निसर्गाच्या सानिध्याचा पर्यटकांना आस्वाद घेत आहेत. सध्या येथे सिनेमाचे चित्रीकरण सुद्धा सुरू असल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे.
--------------
चौकट
मद्यपींचा पर्यटकांना त्रास
तलावाजवळ पाणी असल्याने कुटुंबासह आलेले अनेक पर्यटक स्वतः जेवण तयार करून जेवतात. त्याठिकाणी काही मंडळी मद्यपान करून वावरतात. त्यामुळे महिला पर्यटकांना, स्थानिक स्त्रिया व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या मद्यपींचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.