सीता स्वयंवर लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीता स्वयंवर लेख
सीता स्वयंवर लेख

सीता स्वयंवर लेख

sakal_logo
By

60222
-----

पुनर्रचित ‘सीता स्वयंवर’
पुस्तकाचे आज पुण्यात प्रकाशन
विष्णुदास भावे यांना अनोखी आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८४३ मध्ये सांगलीमध्ये झाला आणि मराठी नागर रंगभूमीची सुरुवात झाली.
विष्णुदास भावे यांनी सांगलीचे तत्कालीन संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्या सांगण्यावरून हे नाटक सादर केले होते. पण, या नाटकाचे स्वरूप लिखित नसल्याने आज या नाटकासाठी लिहिलेली पदेच फक्त उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर त्या काळात विष्णुदास भावेंनी नाटकाचे लेखन व सादरीकरण कसे केले असेल याचा अंदाज बांधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राने १९९९ साली पुनर्रचित ‘सीता स्वयंवर’चा प्रयोग सादर केला. यंदाच्या रंगभूमी दिनी उद्या (शनिवारी) प्रवीण भोळे पुनर्रचित या ‘सीता स्वयंवर’ पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती उदय कुलकर्णी यांनी दिली.

पुस्तकरूपात येणाऱ्या पुनर्रचित ‘सीता स्वयंवर’ची वैशिष्ट्ये म्हणजेच या पुस्तकात रंगावृत्तीखेरीज स्वत: श्री. भोळे यांची दीर्घ प्रस्तावना या पुस्तकात आहे. या प्रस्तावनेत विष्णुदास भावेंच्या नाट्यविषयक प्रेरणांपासून १९९ मध्ये संहिता नव्याने रचताना मनाशी बाळगलेली उद्दिष्ट्ये, संशोधन कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष प्रयोग उभारणीपर्यंतच्या प्रवासाचा तपशील आहे. या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी कोल्हापुरातील नाटककार हिमांशू स्मार्त यांनी पार पाडली आहे.
पुणे विद्यापीठ ललित कला केंद्रा’च्या ‘ललित पौर्णिमा महोत्सवा’त मराठी रंगभूमी दिनी या पुस्तकाचे प्रकाशन रात्री नऊ वाजता केले जाणार आहे. प्रारंभी विष्णुदास भावे यांनी रचलेल्या ‘सीता स्वयंवर’ नाटकातील पदांचे गायन होईल. १९९९ मधील ‘सीता स्वयंवर’चे संगीत दिग्दर्शन ज्यांनी केले ते दत्तप्रसाद रानडे व त्यांचे सहकारी ही पदे सादर करतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’च्या परिसरातील ‘अंगणमंच’ येथे हा प्रकाशन समारंभ होणार आहे.