निवृत्त जवानाचा भडगावात सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त जवानाचा भडगावात सत्कार
निवृत्त जवानाचा भडगावात सत्कार

निवृत्त जवानाचा भडगावात सत्कार

sakal_logo
By

60214
----------------------------
निवृत्त जवानाचा भडगावात सत्कार
गडहिंग्लज, ता. ४ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील ऑर्नररी लेफ्टनंट शंकर चोथे सैन्य दलातून निवृत्त झाले. त्याबद्दल श्री. चोथे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांची फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमधून सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले. श्री. चोथे २८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या १९९३-९४ च्या दहावीच्या बॅचच्या वर्गमित्रांनी स्वागत केले. त्यानंतर गावच्या वेशीपासून फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमधून मिरवणूक काढली. केंद्रशाळा व कल्लेश्वर हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, माजी सैनिक संघटना, ग्रामपंचायतीसह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. रामाप्पा करीगार, अमर चव्हाण, बसवराज हिरेमठ, उदय पुजारी, अनिकेत कोणकेरी, प्रकाश चव्हाण, राजू खमलेट्टी, रवींद्र शेंडूरे, सुभाष चोथे, गणपती पट्टणकुडी, सुरेश मगदूम, पांडुरंग कापसे, तिपान्ना कोटगी, दयानंद पट्टणकुडी, सचिन हरळीकर, मोहन पोवार, राजशेखर कित्तूरकर, नारायण मधिहाळी, अनिल तराळ, कुमार चोथे, वसंत नाईक आदी उपस्थित होते.