तुळशी विवाह साहित्य खरेदीसाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळशी विवाह साहित्य खरेदीसाठी गर्दी
तुळशी विवाह साहित्य खरेदीसाठी गर्दी

तुळशी विवाह साहित्य खरेदीसाठी गर्दी

sakal_logo
By

60371
साहित्य खरेदीसाठी ‘लगीनघाई’
कोल्हापूर, ता. ४ ः तुलशी विवाहाला शनिवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे आज दिवसभर तुलशी विवाहासाठी लागणाऱ्या पूजा साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी होती. शनिवार, रविवार सुटी असल्याने बहुतेकांनी या दोन दिवसांमध्ये तुलशी विवाह करून घेण्याची तयारी सकाळपासूनच सुरू केली आहे. महिला वर्ग तुलशी वृंदावन सजविण्यात, रंगविण्यात व्यस्त होता. महाद्वार रोड, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी परिसर, पापाची तिकटी, राजारामपुरी या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. बाजारात मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. आवळा, चिंच, मणी मंगळसूत्र, हळदीचे कापड, हिरव्या बांगड्या, ऊस, रांगोळी असे पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी दिवसभर गर्दी केली.
पूजेसाठी लागणाऱ्या चिंच, आवळा व चुडा आदी वस्तूंची पुडी १० ते १५ रुपये, तर झेंडूची फुले ८० रुपये ते १२० रुपये किलो होती. पाच उसाची मोळी ७० ते १०० रुपये, तर एक ऊस २० ते २५ रुपयांना विक्री होत होता. आजपासून सुरू झालेले तुलशी विवाह त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत सुरू राहतील.