शासकीय कोषागार नियम बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कोषागार नियम बातमी
शासकीय कोषागार नियम बातमी

शासकीय कोषागार नियम बातमी

sakal_logo
By

निवृत्तिवेतनधारकांनी हयातीचे
दाखले तत्काळ द्यावेत
---
निवृत्त कर्मचारी संघटनेचे आवाहन
कोल्हापूर, ता. ६ : राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनी त्यांच्या हयातीचे दाखले नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्या बँकेतून निवृत्तिवेतन घेता, त्याच बँक शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून हयातीचे दाखले सादर करावेत, असे आवाहन जिल्हा निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हिंदुराव पी. पाटील, सचिव नंदकुमार रामाणे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकातील माहितीनुसार, महाराष्ट्र कोशागार नियम १९६८ च्या नियम ३३५ मधील तरतुदीनुसार निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनी १ नोव्हेंबरला हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबरअखेर सादर करणे आवश्यक आहे. निवृत्तिवेतनधारकांचा वार्षिक हयातीचा दाखला भरून घेण्याची जबाबदारी बँकांची असली तरी आपण निवृत्त आणि आपले कर्तव्य म्हणून प्रत्यक्ष बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. बँकेत असलेल्या यादीच्या नावासमोर स्वाक्षरी अथवा अंगठा द्यावा. यासंबंधी खात्री करण्याचा अधिकार बँक अधिकाऱ्यांना आहे. मुदतीत स्वाक्षरी न केल्यास किंवा हयातीचा दाखला न दिल्यास आपल्या नावापुढे अनुपस्थित असा शेरा येईल. त्यामुळे पुढील निवृत्तिवेतन कोशागार कार्यालयाकडून अदा होणार नाही, याचीही नोंद घ्यावी. काळजीपूर्वक हयातीचे दाखले प्रत्यक्ष हजर राहून सादर करावेत. बँकेतील रजिस्टरवर सही करावी.