पॅचवर्क काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॅचवर्क काम
पॅचवर्क काम

पॅचवर्क काम

sakal_logo
By

60392

रस्त्यांची, पॅचवर्कची कामे
शहरात युद्धपातळीवर

कोल्हापूर, ता. ४ : महापालिकेतर्फे शहरामध्ये ठेकेदारामार्फत मंजूर रस्त्यांची व पॅचवर्कची कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. तसेच आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कामाच्या दर्जातही फरक जाणवत आहे.
निर्माण चौक ते हॉकी स्टेडियम ते निर्मिती कॉर्नर येथे महापालिका पॅचवर्क करत आहे. अहिल्याबाई होळकर स्मारक ते क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, डायना कॅसेल रिंगरोड येथे ठेकेदार काम करत आहे. दसरा चौक ते बिंदू चौक, मिरजकर तिकटी या परिसरात महापालिकेच्यावतीने पॅचवर्क, तर तोरस्कर चौक ते संजय गायकवाड पुतळा, आयडीबीआय बँक ते गंजी गल्ली येथे ठेकेदारामार्फत नवीन रस्त्यांची कामे सुरू आहेत. मोरेवाडी जकात नाका ते राजेंद्रनगर पाण्याची टाकी येथे महापालिकेच्या वतीने पॅचवर्कची कामे सुरू आहेत. ठेकेदारामार्फत परिख पूल ते उड्डाणपूल रस्ता, प्रतिभानगर हॉल ते रेड्याची टक्कर, सुभाषनगर येथे रस्ते तयार करण्यात येत आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने सासने ग्राऊंड ते चर्च रोड या रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात आले.