कचरा वेचक निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा वेचक निवेदन
कचरा वेचक निवेदन

कचरा वेचक निवेदन

sakal_logo
By

L60415
राजेंद्रनगर स्वच्छतेसाठी
कचरवेचक महिलांचा इशारा

कोल्हापूर, ता. ४ ः राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरात दररोज कचरा उठावसाठी टिपर गाडी सुरू करावी, नागरिकांवर कारवाई करावी, स्वच्छता करावी आदी मागण्यांची पूर्तता न झाल्यास राजेंद्रनगरमधल कचरावेचक महिला १० नोव्हेंबरला बेमुदत उपोषण करतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन उपायुक्त रविकांत आडसूळ यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, या परिसरात स्वच्छ सुंदर राजेंद्र नगर हा प्रकल्प सहा महिन्यांपासून राबवित आहोत. कचरावेचक महिला दर आठवड्याला स्वच्छता उपक्रम घेत आहेत. पण, नागरिक, महापालिकेच्या यंत्रणेचे सहकार्य मिळत नाही. त्यासाठी विविध मागण्या पूर्ण कराव्यात. त्यात येथील डी वॅट प्रकल्प सुरू करून ओला व सुका कचरा वर्गीकरण व निर्गतीकरण करावे. काही जागांना कोंडाळ्याचे स्वरूप आले आहे. तिथ सुशोभीकरणासाठी सहकार्य करावे. डुक्कर, भटकी कुत्री यांचा बंदोबस्त करावा. लक्ष्मी कांबळे, भारती कोळी, संगीता लोंढे, राजश्री नाईक, शारदा सकटे, अनिता बल्लाळ, अन्नपूर्णा कोगले यांनी निवेदन दिले.