पंचगंगा घाटावर यंदा लोकोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा घाटावर यंदा लोकोत्सव
पंचगंगा घाटावर यंदा लोकोत्सव

पंचगंगा घाटावर यंदा लोकोत्सव

sakal_logo
By

60350

पंचगंगा घाटावर यंदा लोकोत्सव
मंगळवारी पहाटे सजणार दीपोत्सवाचा सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः कोरोनामुळे दोन वर्षे केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झालेला त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सवाचा सोहळा यंदा लोकोत्सव म्हणूनच साजरा केला जाणार आहे. त्याची जय्यत तयारी आता सुरू झाली असून, मंगळवारी (ता. ८) पहाटे पंचगंगा घाटावर ५१ हजार पणत्या प्रज्वलित होणार आहेत. त्याशिवाय विविधरंगी प्रकाशझोतांनी घाट परिसर उजळून निघणार आहे. यानिमित्ताने रांगोळ्या, फुलांच्या सजावटीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत. शिवमुद्रा प्रतिष्ठानने सोहळ्याचे आयोजन केले असून, या सोहळ्याला सहा दशकांहून अधिक वर्षांची परंपरा आहे.
सोमवारी (ता. ७) सायंकाळी सातपासूनच पंचगंगा घाटावर विविध कार्यक्रमांना प्रारंभ होईल. याच दरम्यान घाटावर विविध रांगोळ्यांचा आविष्कार सजायला सुरवात होईल. मंगळवारी (ता. ८) पहाटे तीन वाजता पहिल्या पणतीचे प्रज्वलन होईल आणि त्यानंतर पन्नास हजार पणत्या घाटावर पाजळल्या जातील. या प्रकाशोत्सवाबरोबरच प्रसिद्ध गायक महेश हिरेमठ यांच्या अंतरंग वाद्यवृंदाचा विविध गीतांच्या आविष्कारात हा सारा माहौल स्वरांकित होईल. दरम्यान, घाट परिसरात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेत हा सोहळा सजणार आहे. सोहळ्यात ज्या संस्थांना योगदान द्यायचे आहे त्यांनी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.