शिव-शाहू आघाडीचे उमेदवार रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिव-शाहू आघाडीचे उमेदवार रिंगणात
शिव-शाहू आघाडीचे उमेदवार रिंगणात

शिव-शाहू आघाडीचे उमेदवार रिंगणात

sakal_logo
By

शिव-शाहू आघाडीचे
पाच पदवीधर रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत विद्यार्थी हिताचा आवाज उठवण्यासाठी शिव-शाहू आघाडीचे पाच उमेदवार पदवीधर गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना समाजातील विविध संघटनांचा पाठिंबा असून पाचही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास आघाडीचे प्रमुख सुनील मोदी यांनी व्यक्त केला. आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी सुनील मोदी म्हणाले, ‘‘विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न सोडवून विद्यापीठ विकासाला गती देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. पदवीधर गटातून अक्षय दांगट, श्वेता परुळेकर, अभिजित खोत, राजेश वरक, मंगेश कांबळे, जमीर मुल्ला, नितीन भिलारे, शिवराम मिस्त्री लढणार आहेत. यातील भिलारे आणि मिस्त्री हे दोघे साताऱ्याचे आहेत. हे सर्व उमेदवार सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीतील आहेत. त्यामुळे त्यांना पदवीधरांचा प्रतिसाद मिळेल. पत्रकार परिषदेला शिवाजीराव परुळेकर, सुभाष जाधव, मंजित माने, अवधूत साळोखे, हर्षेल सुर्वे, अवदेश करंबे, रघुनंदन भावे, मंगेश व श्वेता चितारे आदी उपस्थित होते.