मैदानी स्पर्धेच्या संयोजनाचा कला महाविद्यालयाला मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदानी स्पर्धेच्या संयोजनाचा 
कला महाविद्यालयाला मान
मैदानी स्पर्धेच्या संयोजनाचा कला महाविद्यालयाला मान

मैदानी स्पर्धेच्या संयोजनाचा कला महाविद्यालयाला मान

sakal_logo
By

60745
कोवाड ः शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक मैदानावर स्पर्धेचे उद्‍घाटन करताना ओलम कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल

मैदानी स्पर्धेच्या संयोजनाचा
कोवाड महाविद्यालयाला मान
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ६ ः येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला शिवाजी विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेच्या संयोजनाचा मान मिळाला. स्पर्धेचे उद्‍घाटन विद्यापीठाच्या सिंथेटिक मैदानावर ओलम कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाले. उद्‍घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एम. व्ही. पाटील होते. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला.
महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. आर. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी स्वागत केले. क्रीडा स्पर्धेच्या संयोजनाची संधी दिल्याबद्दल शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभाग व विभागीय स्पर्धा संयोजन समितीचे त्यांनी आभार मानले. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या संचालकपदी निवड झालेले प्रा. शरद बनसोडे व विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. पी. टी. गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. भरत कुंडल यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाच्या सिंथेटिक मैदानामुळे ग्रामीण भागातील खेळाडूना चांगली संधी मिळाली असल्याचे सांगून गायकवाड यांनी खेळाडूनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या वेळी डॉ. पी. एस. पाटील, डॉ. व्ही. एस. पाटील, प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे, भाऊसाहेब वडार, बी. के. पाटील उपस्थित होते. डॉ. मोहन घोळसे यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. दिपक पाटील यांनी आभार मानले.