वडीलासह चिमुकल्याचा निर्घृण खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडीलासह चिमुकल्याचा निर्घृण खून
वडीलासह चिमुकल्याचा निर्घृण खून

वडीलासह चिमुकल्याचा निर्घृण खून

sakal_logo
By

60427 - मृत केंचाप्पा हारके
60426
तुपूरवाडी : पुरावा लपवण्याच्या हेतूने रक्ताने माखलेले पोते व कपडे गवतात असे टाकले होते.

वडिलांसह चिमुकल्याचा
निर्घृण खून

गडहिंग्लज, ता. ४ : तुपूरवाडी (ता. गडहिंग्लज) हद्दीतील शेतवडीत बकऱ्यांचा कळप घेऊन आलेल्या एका मेंढपाळासह त्याच्या तीन वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार आज सायंकाळी उघडकीस आला. दोघे कर्नाटकातील जोडकुरळी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव)चे आहेत. हल्लेखोर पळून गेले असून पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. केंचाप्पा मारुती हारके (३७) व त्याचा मुलगा शंकर (३) अशी मृतांची नावे आहेत.
सकाळी साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती दुपारी समजली. जोडकुरळी येथील मेंढपाळांची काही कुटुंबे तुपूरवाडी येथे वीस वर्षांपासून बकरी घेऊन येतात. दरम्यान, यावर्षी दोन नोव्हेंबरपासून हारके व त्यांच्या जवळच्या नातेवाइकांचे कुटुंब तुपूरवाडी हद्दीतील रिकाम्या शेतवडीत बकऱ्‍यांचा कळप घेऊन आले होते. सकाळी केंचाप्पाची पत्नी श्रीदेवी लहान मुलीला घेऊन काही अंतरावरील पाणवठ्यावर कपडे धुण्यासाठी गेली. त्यावेळी केंचाप्पा, मुलगा शंकर व नातेवाईकांच्या कुटुंबातील काही सदस्य तळावर होते.
दरम्यान, श्रीदेवी कपडे धुऊन तळावर आली असताना तिला कोणीच दिसत नव्हते. तिने पती व मुलाचा शोध घेतला. शेतवडीत कुठे तरी गेले असतील म्हणून ती तळावरच आपल्या कामात मग्न झाली. दरम्यान, हल्लेखोरानेच आपल्या भावाला केंचाप्पाशी भांडण झाल्याचे दूरध्वनीवरून सांगितले. त्याने आपल्याच गावातील; परंतु मुंगूरवाडीलगत बकरी आणलेल्या एका दुसऱ्‍या मेंढपाळाला दूरध्वनी करून घटनेची माहिती घेण्यास सांगितले. त्या मेंढपाळाने घटनास्थळी येऊन पाहणी केली असता चिमुकला शंकर बांधावरील उंच गवतामध्ये जखमी अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ त्याने नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शंकरच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली होती. मानेभोवती आवळल्याचा व्रणही होता. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी सांगितले. केंचाप्पाही गवतामध्येच रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला होता. त्याच्या डोकीत किंवा मानेवर कोणत्या तरी धारदार शस्त्राने वार झाल्याने चेहऱ्‍यासह संपूर्ण शरीर, कपडे व आसपासचे गवत रक्ताने माखले होते. केंचाप्पा जागीच ठार झाला होता. रक्ताने माखलेले पोते व काही कपडे पुरावा लपवण्याच्या हेतूने गवतात टाकले होते.
हल्लेखोराच्या भावाने मृत केंचाप्पाच्या जोडकुरळीतील सख्ख्या भावांना याची माहिती दिली. त्यानंतर भाऊ सिद्धाप्पा, रायाप्पासह इतर नातेवाईक सायंकाळच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यातील केंचाप्पाला पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. माहिती मिळताच तुपूरवाडी, कडाल, मुंगूरवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्यासह आजरा, नेसरीचे पोलिस अधिकारी फौजफाटा घेऊन घटनास्थळी आले. शेळके यांनी केंचाप्पाची पत्नी, भाऊ यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली. कारणांचा शोध घेतला. त्यावेळी केंचाप्पाची पत्नी श्रीदेवीने गुरुवारी (ता. ३) रात्री बिराप्पा संकरट्टी व केंचाप्पा यांच्यात वाद झाल्याची माहिती शेळके यांना दिली. याच वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बिराप्पा सापडल्यानंतरच त्याचा उलगडा होईल, असे शेळके यांनी सांगितले. नेसरी पोलिसात शंकरच्या मृताची नोंद झाली आहे. गडहिंग्लज पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. केंचाप्पाच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

* दोन तासांनी समजला प्रकार
कडाल-मुंगूरवाडी रोडपासून एक किलोमीटरवर आत शेतवडीत खुनाचा प्रकार घडला आहे. श्रीदेवीने मुलगा शंकरला शोधताना तिथे असणाऱ्‍यांनी तो मोबाईल चार्जिंग करण्यासाठी गावात गेल्याचे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून श्रीदेवी त्याच शेतवडीत बकऱ्‍यांसोबत राहिली. तळाच्या शेजारीच शेताच्या बांधावरील उंच गवतात आपला पती व मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची किंचितशीही कल्पना नसलेल्या श्रीदेवीला दोन तासांनी हा धक्कादायक प्रकार समजला.