गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हा
गुन्हा

गुन्हा

sakal_logo
By

संजय वास्करवर विनयभंगाचा गुन्हा

कोल्हापूर, ता. ४ : संजय वास्कर याने कार्यालयात बोलवून शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून आपला विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने करवीर पोलिस ठाण्यात दिली. यावरून वास्कर याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------

पार्ट चोरीप्रकरणी
तीन महिलांना अटक

कोल्हापूर, ता. ४ : मार्केट यार्डमधील एका कंपनीत चोरी केल्याप्रकरणी तीन महिलांना अटक करण्यात आली. भिंगरी सकट, नम्रता गायकवाड, अश्विनी नाईक असे अटक केलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड परिसरातील या कंपनीमध्ये २२ ते २८ ऑक्टोबरदरम्यान स्पेअर पार्टची चोरी झाली होती. याबाबतची फिर्याद कर्मचारी महेश गोसावी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने संशयितांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील संशयित सकट, गायकवाड व नाईक या तिघींनी चोरी केल्याचे तपासात पुढे आले. या संशयित महिलांकडून चोरी केलेल्या ८ लाख ३० हजारांच्या साहित्यापैकी दीड लाख रुपयांचे साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.