जय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जय
जय

जय

sakal_logo
By

जयसिंगपूरमधील रेल्वेक्रॉस पुलाबाबत
सकारात्मक कार्यवाहीचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

मुंबई, दि. ४ : जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील रेल्वेक्रॉस पुलाबाबत परिसरातील रहिवासी क्षेत्र आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. या पुलाबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. बैठकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, परिवहन विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता अरोरा आदी सहभागी झाले.

जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर आरओबी पूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. वर्दळीचा मार्ग आणि आजूबाजूचे रहिवासी क्षेत्र यामुळे येथे सुरक्षेच्यादृष्टीने पूल व्हावा, अशी मागणी होती. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी या पुलाबाबत स्थानिक रहिवाश्यांची सुरक्षितता, वाहनांची मोठी वर्दळ हे लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले.