रंग- शिल्पसौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंग- शिल्पसौंदर्य
रंग- शिल्पसौंदर्य

रंग- शिल्पसौंदर्य

sakal_logo
By

६०४३७
शहाजी कॉलेजमधील
राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा

सामाजिक सुधारणांचे प्रणेते असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या पद्धतीच्या पोशाखातील चित्र, शिल्प, मूर्ती इतकेच काय लहान मुलांनी केलेल्या चित्रांतूनही राजर्षी शाहूंचा विचार रूजवण्यासाठी नेहमीच प्रयत्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून दसरा चौकातील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या परिसरातही राजर्षी शाहूंचा पुतळा साकारला गेला.
हे शिल्प बनवताना शिल्पकार जाधव यांनी मध्यम वय ओलांडलेल्या वयातील राजर्षींचा चेहरा साकारला आहे. शाहू महाराजांनी राज्यारोहण समारंभात क्वचितच वापरलेली समारंभावेळी वापरायची पगडी, गळ्यात मोत्यांची माळ आणि तीव्र अलंकरण असलेल्या राजेशाही रोब अंगावर दर्शवला आहे. पुतळ्याचे अनावरण २५ ऑगस्ट १९८३ ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे तत्कालीन चेअरमन श्रीपतराव बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा साकारण्यात आला आहे.