बाजार समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती
बाजार समिती

बाजार समिती

sakal_logo
By

60496
...
बाजार समितीच्या वाढीव
मतदारांची तपासणी करा
.....
राजेश क्षीरसागर ः जिल्हा उपनिबंधकांसोबत घेतली बैठक
..........
कोल्हापूर, ता. ५ ः बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सभासंदाची बेकायदेशीररित्या मतदार यादीत नोंद केल्याची तक्रार होत असून, याबाबत तत्काळ वाढीव सभासद मतदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी सदर कागदपत्रे ताब्यात घ्यावीत. तसेच त्याची निरपेक्ष तपासणी करून अशा मतदारांची नोंदणी रद्द करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
बाजार समितीच्या विविध प्रश्नासंदर्भात शनिवार पेठेतील शिवसेनेच्या कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, माजी महापौर व माजी संचालक नंदकुमार वळंजू, व्यापारी संघटनेचे सदानंद कोरगावर आदी उपस्थित होते.
वाढीव मतदारांच्या नोंदणी संदर्भात वळंजू ,कोरगावकर यांनी आक्षेप घेतला. कायदेशीर बाबी डावलून सुमारे २९२ सभासदांची मतदार यादीत नोंदणी केली आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ११८८ सभासदांची नोंद असताना गेल्या काही दिवसांत प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत १४३२ सभासदांची नोंद करण्यात आली आहे. वाढीव केलेल्या मतदार सभासदांना बैठकीमध्ये सचिवांच्या सहीने अर्ज देणे गरजेचे आहे. यांसह त्यावर सभापतींची स्वाक्षरी असणे कायद्याने बंधनकारक असताना अशी कोणतीही प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नाही. यामुळे या संपूर्ण वाढीव सभासद मतदार यादीची व सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी केली.
या वेळी क्षीरसागर यांनी, जर बेकायदेशीर काम होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. हे सरकार शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने तत्काळ समितीच्या सचिवांकडून वाढीव मतदार यादीतील सभासदांची कागदपत्रे ताब्यात घ्यावीत, अशा सूचना केल्या.