मेन राजारामप्रश्‍‍नी जनभावनांचा आदर करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजारामप्रश्‍‍नी जनभावनांचा आदर करावा
मेन राजारामप्रश्‍‍नी जनभावनांचा आदर करावा

मेन राजारामप्रश्‍‍नी जनभावनांचा आदर करावा

sakal_logo
By

‘मेन राजाराम’ प्रश्‍‍नी जनभावनांचा आदर करावा
आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ५ : भवानी मंडपातील मेन राजाराम हायस्‍कूलच्या स्‍थलांतराची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयात याबाबत चर्चा केली; मात्र या शाळेची पटसंख्या, त्याचे ऐतिहासिक महत्त्‍व आणि सर्वांत महत्त्वाचे म्‍हणजे जनभावनांचा आदर करावा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी व्यापक बैठकीचेही आयोजन करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

मेन राजाराम हायस्‍कूल व ज्युनियर कॉलेजचे स्‍थलांतर करण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. पालकमंत्री केसरकर यांनी याबाबतचा आग्रह धरला आहे. याबाबत आपली भूमिका काय, अशी विचारणा आमदार पाटील यांना केली असता त्यांनी याबाबत सविस्‍तर माहिती दिली. पालकमंत्री केसरकर यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बैठकीत याबाबत माहिती दिली. शाळेची पटसंख्या कमी असल्याने स्‍थलांतर करण्याचा त्यांनी प्रस्‍ताव मांडला आहे; मात्र यावर चर्चा होणे आवश्यक आहे. या शाळेला ऐतिहासिक महत्त्व आहे. या शाळेचे स्‍थलांतर न करता अन्य पर्याय काय आहेत, शाळेबाबत लोकभावना काय आहेत, याचाही विचार करणे आवश्यक आहे. घाईने हा निर्णय घेऊ नये. यावर सविस्‍तर बैठक बोलावून सर्वांची मते जाणून घेणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे योग्य नाही. लोकशाही शासन पद्धतीत अशी मुस्कटदाबी करता येणार नाही. भाषणामध्ये काय बोलावे किंवा काय बोलू नये, याबाबत सूचना देणे समजू शकते; मात्र थेट सभेलाच बंदी घालणे हे अजिबात योग्य नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
...

कोणाला बोलवायचे
याचा विचार करावा
अल्‍पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या भडकाऊ वक्‍तव्याबाबत विचारले असता, पालकमंत्री केसरकर यांनी याबाबतीत वस्‍तुस्‍थिती मांडली आहे. समाजात तेढ निर्माण होऊ नये याची सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आयोजकांनीही कोणाला बोलवायचे याचा विचार करावा, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.