युनिक ॲकॅडमीतर्फे मोफत मार्गदर्शन शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युनिक ॲकॅडमीतर्फे मोफत मार्गदर्शन शिबीर
युनिक ॲकॅडमीतर्फे मोफत मार्गदर्शन शिबीर

युनिक ॲकॅडमीतर्फे मोफत मार्गदर्शन शिबीर

sakal_logo
By

युनिक ॲकॅडमीतर्फे
आज मार्गदर्शन शिबिर
कोल्हापूर, ता. ५ ः युनिक ॲकॅडमीतर्फे रविवारी (ता. ६) एमपीएससी राज्यसेवा नवीन अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणाऱ्या पूर्व, मुख्य आणि मुलाखतीच्या परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. खासबाग मैदान येथील भोसले प्लाझा येथे दुपारी साडेचार वाजता हे शिबिर होईल. आगामी परीक्षेचे नियोजन योग्य कालावधीत कसे करावे, कोणते संदर्भ साहित्य वापरावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. नवीन अभ्यासक्रमानुसार नव्या पद्धतीने तयारी करावी लागणार आहे. यामध्ये एनसीआरआरटीचे महत्त्‍वपूर्ण योगदान असणार आहे. युनिक ॲकॅडमीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन गेल्या वर्षी राज्यातील १६५ विद्यार्थी, तर कोल्हापुरातून पाच विद्यार्थी वर्ग १ व २ चे अधिकारी झाले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ, घेण्याचे आवाहन संचालक शशिकांत बोराळकर यांनी केले आहे.