आजरा ः लम्पीचा पाचवा बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः लम्पीचा पाचवा बळी
आजरा ः लम्पीचा पाचवा बळी

आजरा ः लम्पीचा पाचवा बळी

sakal_logo
By

आजरा तालुक्यात लम्पीचा पाचवा बळी
आजरा, ता. ५ ः आजरा तालुक्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. उत्तूर परिसरातील लम्पीचा प्रभाव तालुक्याच्या पूर्व भागातही पोचला आहे. सिरसंगी (ता. आजरा) येथे गणपती नारायण कुंभार यांच्या दीड वर्षांच्या पाडीचा मृत्यू लम्पीने झाला. त्यामुळे तालुक्यातील लम्पी रोगामुळे पाच जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. लम्पीचा प्रभाव उत्तूर परिसरात होता. तो आता तालुक्या्च्या पूर्व भागातही पोचला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. आजरा तालुक्यात लम्पी रोगाचा चंचुप्रवेश उत्तूर भागात झाला. त्यानंतर या परिसरातील पेंढारवाडी, उतूर व बहिरेवाडीत लम्पीबाधीत जनावरे सापडली. बहिरेवाडी तर २६ जनावरे लम्पीग्रस्त आढळली. लम्पीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन, पशुवैद्यकीय विभाग व गोकुळ यांनी लसीकरणावर जोर दिला आहे. हे जरी खरे असले तरी लम्पीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. चार दिवसांपूर्वी सिरसंगीत लम्पीग्रस्त गाईची पाडी आढळली होती. तिचा आज मृत्यू झाला.