जिल्ह्याच्या काही भागात पावसाची झोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्याच्या काही भागात पावसाची झोड
जिल्ह्याच्या काही भागात पावसाची झोड

जिल्ह्याच्या काही भागात पावसाची झोड

sakal_logo
By

60564
मांगवली ः गावात शनिवारी जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा पावसाची झोड
वैभववाडी, ता. ५ ः उंबर्डे परिसरातील दहा-बारा गावांना तुलसी विवाहाच्या मुहूर्तावर आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे सिंधुदुर्गावर पावसाची मेहेरनजर कायम असल्याचे दिसते. जिल्ह्यात पावसाचे सावट कायम असल्यामुळे भातपीक कापणीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. आंबा, काजू पिकांवर देखील पावसाचा परिणाम होणार असल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात परतीचा पाऊस लांबला होता; परंतु गेल्या दहा-बारा दिवसांपासून कुठेही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६० ते ७० टक्के भातपिकाची कापणी पूर्ण झाली. गेले दोन दिवस जिल्ह्यात सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत होते. आज सकाळपासूनही तसेच होते. उष्म्याचे प्रमाण देखील एकदम वाढले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास उंबर्डे परिसरात सुरुवातीला हलक्या सरी पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मांगवली, भुईबावडा, हेत, उपळे, वेंगसर, कोळपे कुसुर यांसह विविध गावांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. मांगवलीला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले. तुलसी विवाहाच्या मुहूर्तावर पाऊस कोसळल्यामुळे लोकांनी केलेल्या तयारीवरदेखील पाणी फेरले. या शिवाय खारेपाटण परिसरात देखील पावसाच्या हलक्या सरी पडल्या. जिल्ह्यात पुन्हा पावसाचे आगमन झाल्यामुळे भातपीक शेतकरी आणि बागायतदारांची चिंता वाढणार आहे. जिल्ह्यात अजूनही ३० टक्के कापणी शिल्लक आहे. याशिवाय माघारी फिरलेला पाऊस आंबा, काजू बागायतदारांची देखील डोकेदुखी वाढविणार आहे.