१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

काळ बदलत असतो
काळ बदलत असतो व काळानुरूप इतिहासही बदलत असतो, असे म्हणतात. ब्रिटिशांनी सन १८५८ ते १९४७ पर्यंत आपल्या देशावर राज्य केले. या देशाची संपत्ती ते घेऊन गेले. या देशाचे वैभव नष्ट करून ते गेले. स्वातंत्र्यासाठी कित्येकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. ज्याचे दुष्परिणाम आपल्या देशातील नागरिकांनी भोगले. मात्र, तो काळ आता बदलला आहे. आज भारतीय वंशाचे ४२ वर्षीय तरुण ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली, ही भारतीयांसाठी निश्‍चितच भूषणावह बाब आहे. प्रबळ इच्छाशक्ती असणारे आपली स्वप्ने पूर्ण करूनच दाखवितात, हे त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधानपद होऊन दाखवून दिले. सुनक यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. ते या देशाच्या तरुणांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतील, हे नक्की. ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषविल्याबद्दल सुनक यांचे मनापासून अभिनंदन..!
शाम तळोकर, इस्लामपूर (जि. सांगली)

‘सकाळ’ ः एक पाऊल पुढे
काळानुसार ‘सकाळ’ नेहमीच नवे-नवे बदल अंगीकारत असतो. त्याचेच प्रतिबिंब ताज्या व विश्‍वासार्ह बातम्या, विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखांत उमटते. अंकातील बातम्या व लेखांची शीर्षके तर खूपच लक्षवेधी असतात. आशय वाचकांना ज्ञात होतो. बातमी व लेखांतील तपशील मनाला भावतात. त्यांद्वारे वाचक अंकाशी खिळून राहतात. ‘सकाळ’ वाचकांना ज्ञानाचे भांडार व माहितीचा खजिना उपलब्ध करून देतो. वृत्तपत्रांच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘सकाळ’ एक पाऊल पुढे आहे, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
नीळकंठ देशिंगकर, मिरज (जि. सांगली)