केडीसी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीसी बातमी
केडीसी बातमी

केडीसी बातमी

sakal_logo
By

बँक लोगो
......
अनुदान लाभार्थ्यांनाही
मिळणार डेबिट कार्ड

जिल्हा बँकेचा निर्णय ः एक लाख १९ हजार जणांना लाभ

कोल्हापूर, ता. ६ ः कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ग्राहकांना शाखेतच इन्स्टा रुपे डेबिट कार्ड देण्याची सुविधा सुरू आहे. दरम्यान, वैयक्तिक अनुदानाच्या विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांनाही इंस्टा रुपे कार्ड दिली जाणार आहेत. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाभरातील एक लाख १९ हजार लाभार्थ्यांना मोफत इंस्टा रुपे डेबिट कार्ड दिली जाणार आहेत. तसेच, या योजनांमधील अंगठा करणाऱ्या लाभार्थ्यांनाही बायोमेट्रिक पद्धतीने सुविधा दिली जाणार आहे.
केडीसीसी बँकेकडे विविध योजनांच्या माध्यमातून वैयक्तिक शासकीय अनुदान जमा होणाऱ्या जिल्हाभरातील लाभार्थ्यांची संख्या एक लाख १९ हजार आहे. यामध्ये राष्ट्रीय वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, देवदासी, कलाकार मानधन आदी योजनांमधील लाभार्थ्यांचा समावेश आहे. या खातेदारांना बँकेमार्फत इंस्टा रुपे डेबिट कार्ड मोफत दिली जाणार आहेत. बँकेने ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा देता येणार आहे. अशा लाभार्थ्यांचे खाते शून्य बॅलन्सवर उघडले जाते. तसेच या इन्स्टा रुपे डेबिट कार्डचा खर्च बँक स्वत:च्या निधीमधून करणार आहे.
.......

अंगठा करणाऱ्यांना
बायोमेट्रिक सुविधा

शासकीय वैयक्तिक अनुदान लाभार्थ्यांमध्ये अंगठा करणाऱ्यांना बँकेकडून बायोमेट्रिक सुविधाही दिली जाणार आहे. खातेदारांना बायोमेट्रिक पद्धतीने शाखेत व त्यांच्या गावात पैसे देण्याची सोय केली जाणार आहे. तरी शासकीय अनुदान खातेदारांनी आपल्या संबंधित शाखेकडे कार्ड मागणीची नोंद करावी, असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले आहे.