मेन राजारामसाठी चळवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजारामसाठी चळवळ
मेन राजारामसाठी चळवळ

मेन राजारामसाठी चळवळ

sakal_logo
By

चला ‘मेन राजाराम’ वाचवूया
...... लोगो
.....

‘मेन राजाराम’ स्थलांतराला जनतेचा विरोध
---
कृती समितीकडून आंदोलनाला सुरुवात; जिल्हा परिषदेसमोर आज निदर्शने
कोल्हापूर, ता. ६ ः मेन राजाराम हायस्कूलच्या स्थलांतराला आता जनतेतूनच विरोध होऊ लागला आहे. नागरिकांचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या तसेच शहराच्या प्रश्‍नांवर आवाज उठविणाऱ्या विविध कृती समितींनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यासाठी दबाव गट तयार होत असून, त्यांच्या विरोधाचा आदर केला गेला नाही तर जनआंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शाळा स्थलांतराचा घाट रचला. त्यासाठी महापालिकेच्या बंद शाळांचीही चाचपणी सुरू केली आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या शाळेच्या इमारतीतून शाळा हलविणे ही बाब राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणाला तिलांजली देण्यासारखे असल्याचे मत जनतेतून व्यक्त केले जाते. स्थलांतराची बाब उघड झाल्यावर त्याबाबत विरोध दर्शविण्यात येऊ लागला आहे. या धोरणाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली असून, दबाव गट तयार होऊ लागला आहे. उद्या (ता. ७) कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती जिल्हा परिषदेच्या दारात दुपारी साडेबाराला निदर्शने करणार आहे. मेन राजाराम हायस्कूल ज्या इमारतीत आहे, त्याच ठिकाणी सुरू राहिले पाहिजे, अशी समितीची मागणी आहे.
कोल्हापूर नागरी कृती समितीनेही पालकमंत्र्यांनी ‘मेन राजाराम’ हलविण्याच्या रचलेल्या घाटाला विरोध केला आहे. निमंत्रक आर. के. पोवार तसेच बाबा पार्टे यांनी पालकमंत्र्यांना येथील शाळा हलवू देणार नाही. जनतेला विचारात न घेता कोणतेही निर्णय घेतल्यास जनआंदोलन छेडून त्याला कडाडून विरोध केला जाईल. याबाबत बैठक घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ई वॉर्ड लोककल्याण व संघर्ष समितीचे ॲड. बाबा इंदूलकर यांनीही या निर्णयाविरोधात दबाव गट तयार केला जाणार आहे, त्यासाठी पालक, विद्यार्थी, माजी शिक्षक, शिक्षकांशी चर्चा करण्यात येईल. उद्या याबाबत बैठक घेण्याची तयारी सुरू आहे, असे सांगितले.
बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीतर्फे संस्थापक किसन कल्याणकर, अध्यक्ष रामेश्‍वर पत्की यांनीही स्थलांतराला विरोध केला आहे. या हेरिटेज वास्तूत शाळाच सुरू राहावी, इतर कशासाठी त्याचा वापर होऊ नये ही भूमिका असल्याचे सांगितले. तसेच, ती मंत्री, जिल्हा प्रशासनाला घ्यायला लावू, असेही सांगितले. यामुळे शहरातून पालकमंत्र्यांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना विरोध सुरू झाला असून, हे प्रयत्न न थांबविल्यास जनआंदोलन उभे राहणार, यात शंकाच नाही.