मुश्रीफ मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफ मदत
मुश्रीफ मदत

मुश्रीफ मदत

sakal_logo
By

60757
....

मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार

मुश्रीफ ः जठारवाडीत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन

शिये, ता. ६ : कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना मुश्रीफ फौंडेशनकडून प्रत्येकी ५० हजार रुपये देणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.
मुश्रीफ यांनी आज जठारवाडी येथील मयत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांचीही आमदार मुश्रीफ यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करवीर तालुका अध्यक्ष मधुकर जांभळे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, प्रदीप पाटील-भुयेकर, सरपंच नंदकुमार खाडे, सुरेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान, काल रात्री पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी मृत वारकरी कुटुंबीयांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. या वेळी जठारवाडीचे सरपंच नंदकुमार खाडे, शियेचे उपसरपंच प्रभाकर काशीद, जठारवाडीचे ग्रामपंचायत सदस्य दयानंद स्वामी, युवराज जाधव उपस्थित होते.