बावडा दिपसंध्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावडा दिपसंध्या
बावडा दिपसंध्या

बावडा दिपसंध्या

sakal_logo
By

60766
......

बावड्यात आज दीपसंध्या कार्यक्रम

त्रिपुरारी पौर्णिमेचे ः विद्युत रोषणाईने उजळला राजाराम बंधारा

कसबा बावडा, ता. ६ ः त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उद्या (ता. ७) सायंकाळी सहा वाजता कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथील पंचगंगा घाटावर ''दीपसंध्या २०२२'' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ''जीव माझा गुंतला फेम'' अंतरा आणि मल्हार हे या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहेत. कार्यक्रमास आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर राजाराम बंधाऱ्याला लागून असलेल्या पर्यायी पुलाला आकर्षक विद्युत रोषणाई केली असून या रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. रविवारच्या सुटीची पर्वणी साधत रात्रीपासून नागरिकांची विद्युत रोषणाई पाहण्यासाठी राजाराम बंधारा परिसरात वर्दळ वाढली आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सोमवारी सायंकाळी भारतवीर मित्र मंडळाच्या वतीने पंचगंगा घाटावर दीप उजळणी, सहा वाजता पंचगंगा जलपूजन, सायंकाळी साडेसहा वाजता सुरेल गाण्यांचा कार्यक्रम व त्यानंतर महिलांसाठी स्पॉट गेम स्पर्धा होणार आहेत. कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहणाऱ्या महिलांना ड्रॉ द्वारे विशेष बक्षीस दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन दीपसंध्या उत्सव कमिटी यांनी केले आहे.