खूनातील संशयीतांना कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खूनातील संशयीतांना कोठडी
खूनातील संशयीतांना कोठडी

खूनातील संशयीतांना कोठडी

sakal_logo
By

दुहेरी खुनातील
संशयितांना कोठडी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : तुप्पूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथे मेंढपाळ व त्याच्या चार वर्षीय मुलाच्या दुहेरी खूनप्रकरणी अटक केलेल्या बिराप्पा मारुती शंकरट्टी व सत्यव्वा ऊर्फ दड्डव्वा बिराप्पा शंकरट्टी (दोघेही रा. जोडकुरळी, ता. चिक्कोडी) या संशयित पती-पत्नीची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यां‍नी १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
शुक्रवारी (ता. ४) सकाळी साडेदहाच्या सुमारास मेंढपाळ केंच्चापा हारके व त्यांचा मुलगा शंकर हारके यांचा निर्घृन खून झाला. खुनाच्या घटनेनंतर शेजारीच असलेल्या तळावरील मेंढपाळ बिराप्पा व त्याची पत्नी सत्यव्वा हे दोघेही फरार झाले होते. दरम्यान, मृत केंच्चापाची पत्नी श्रीदेवी हिने किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग धरून बिराप्पा व सत्यव्वा यांनी आपल्या पती व मुलाचा खून केल्याची फिर्याद दिली होती. संशयित दोघांनाही पोलिसांनी कमतनूर (ता. हुक्केरी) येथून ताब्यात घेतले. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.