विद्यापीठ निवडणूक प्रचार तयारी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ निवडणूक प्रचार तयारी बातमी
विद्यापीठ निवडणूक प्रचार तयारी बातमी

विद्यापीठ निवडणूक प्रचार तयारी बातमी

sakal_logo
By

विद्यापीठ
... लोगो
....

पदवीधरांच्या मेळाव्याने होणार प्रचाराला प्रारंभ
---
विद्यापीठ निवडणूक; दोन्ही आघाड्यांकडून होणार शक्तिप्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधर गटातील चुरस वाढली आहे. विद्यापीठ विकास आघाडी आणि शिव-शाहू आघाडी यांनी पदवीधरांचे मेळावे घेण्याचे नियोजन केले. या मेळाव्यातूनच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे.
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक प्रक्रियेतील अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली. पदवीधर गटातील महिला राखीव जागेवर डॉ. उषा पवार आणि अनुसूचित जाती (एस.टी.) राखीव जागेवर लोहाजी भिसे हे बिनविरोध निवडून आले आहेत. हे दोन्ही विजयी उमेदवार विद्यापीठ विकास आघाडी अंतर्गत असणाऱ्या विद्यापीठ विकास मंचाचे सदस्य आहेत. त्यामुळे आता पदवीधर गटातून आठ जागांसाठी १४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. शिव-शाहू आघाडीचा पदवीधर मतदारांचा मेळावा बुधवारी (ता. ९) होणार असून, याला युवा सेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वरुण सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती असेल. विकास आघाडी अंतर्गत असणाऱ्या विकास मंचाचा पदवीधर मेळावा उद्या (ता. ७) राम गणेश गडकरी सभागृहात होणार आहे. याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती असेल. दोन्ही आघाड्या या मेळाव्यांतून शक्तिप्रदर्शन करणार असून, या निमित्ताने प्रत्यक्ष प्रचाराचा प्रारंभ होईल.
------------------
विद्यापीठ विकास आघाडीचे प्रचारातील मुद्दे
- विद्यापीठाला ए प्लस, प्लस मानांकन मिळाले
- खेळाडूंना वाढीव गुण, त्यांचा विमा मिळवून दिला
- इनडोअर खेळांसाठी मैदान आणि वसतिगृह
- संशोधनासाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला
- कौशल्य व रोजगाराभिमुख नवे अभ्यासक्रम सुरू करणार
- नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार
----------------------------------------------
शिव-शाहू आघाडीचे प्रचारातील मुद्दे
- विद्यापीठात भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभार करणे
- विद्यापीठ निधी हा विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांसाठी खर्च व्हावा
- कौशल्य विकास कार्यक्रम राबविणार
- खेळाडू, कलाकार आणि एनसीसी छात्र यांच्यासाठी प्रवेशाचा विशेष कोटा करणार
- सर्व परीक्षांचे निकाल वेळेवर आणि बिनचूक लावण्यासाठी व्यवस्था लावणार
- महाविद्यालयांमधील शैक्षणिक सुविधांचे सक्षमीकरण करणार