इचलकरंजीत युवकांसाठी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत युवकांसाठी स्पर्धा
इचलकरंजीत युवकांसाठी स्पर्धा

इचलकरंजीत युवकांसाठी स्पर्धा

sakal_logo
By

इचलकरंजीत युवकांसाठी स्पर्धा
इचलकरंजी : येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलतर्फे युवक, युवती, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘युवास्पंदन’ हा कला स्पर्धा उपक्रम होणार आहे. यामध्ये ७ डिसेंबरला स्वरचित मराठी काव्यवाचन, ८ डिसेंबरला गीत गायन (कराओके), ९ डिसेंबरला वैयक्तिक साहित्य अभिवाचन स्पर्धा होणार आहे. स्पर्धा रोटरी दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र येथे होणार आहेत. १० डिसेंबरला सकाळी पथनाट्य, दुपारी लघुनाटिका स्पर्धा, तसेच ११ डिसेंबरला उपक्रमाच्या समारोपादिवशी दुपारी वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होतील. स्पर्धेसाठी रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धांमध्ये राज्यामधील तसेच गोवा, बेळगाव परिसरातील १६ ते ३० वयोगटांतील युवा कलाकार तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. ३ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.