पालकमंत्र्यांसमवेत बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्र्यांसमवेत बैठक
पालकमंत्र्यांसमवेत बैठक

पालकमंत्र्यांसमवेत बैठक

sakal_logo
By

जनतेला विश्‍वासात घेतल्याशिवाय
कोणताही निर्णय नाही ः क्षीरसागर

कोल्हापूर, ता. ७ ः ‘राज्यात सर्वसामान्यांचे सरकार असून मेन राजाराम हायस्कूलबाबत जनतेला विश्‍वासात घेतल्याशिवाय निर्णय घेतला जाणार नाही. या विषयाची स्पष्टता करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर कृती समितीची त्यांच्यासोबत बैठक घेऊ,’ अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज कृती समितीला दिली.
शहरातील रस्त्यांच्या निधीबाबत क्षीरसागर यांनी बोलवलेल्या बैठकीत कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी मेन राजाराम हायस्कूलचा विषय उपस्थित करून सरकार, पालकमंत्र्यांकडून नेमके काय सुरू आहे, अशी विचारणा केली. ते म्हणाले, ‘या हायस्कूलचा विषय चर्चेत आहे. तेथील शाळा काढून ती इमारत कोणातरी धनिकांच्या हातात सोपवण्याचा प्रस्ताव केला जात आहे, हे बरोबर होणार नाही. त्याबाबतची माहिती जनतेला झाली पाहिजे. अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल.’
याबाबत क्षीरसागर यांनी सांगितले की, ‘दसरा महोत्सवाला व्यापक स्वरूप देण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला. २५ लाखांचा निधी दिला. त्याचे नियोजन केले जात असताना राजर्षी शाहू महाराजांवरील चित्रप्रदर्शन कुठे करता येईल का, याची चर्चा झाली; पण त्यांचा याबाबत अभ्यास सुरू आहे. कोणताही निर्णय झालेला नाही. निर्णय घेतला जात असताना सर्वांना विश्‍वासात घेतले जाईल. त्याबाबत ते दौऱ्यावर आल्यावर त्यांच्याकडून माहिती घेऊ. तसेच कृती समितीलाही चर्चेला बोलवू.