मेन राजारामाबबत सध्या कोणताही निर्णय नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजारामाबबत सध्या कोणताही निर्णय नाही
मेन राजारामाबबत सध्या कोणताही निर्णय नाही

मेन राजारामाबबत सध्या कोणताही निर्णय नाही

sakal_logo
By

‘मेन राजाराम’बाबत कोणताही निर्णय नाही

पालकमंत्री केसरकर; लोकांना विश्‍‍वासात घेऊनच निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ७ : ‘मेन राजाराम’ स्‍थलांतराबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. शाळेची दुरुस्‍ती आवश्यक आहे. ती कशा पद्धतीने करता येईल, यासाठी शाळेला भेट दिली होती. शाळेबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर येथील लोकांना विश्‍‍वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ‘सकाळ’ला दिली.

मेन राजाराम हायस्‍कूलचे स्‍थलांतर करण्याचा घाट घालण्यात आला आहे. याबाबत नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जिल्‍ह्यातील पक्ष, संघटना, राजकीय नेते यांनी या निर्णयास विरोध केला आहे. तसेच, जनआंदोलन उभारण्याची तयारीही केली आहे. या सर्व पा‍र्श्‍वभूमीवर बोलताना पालकमंत्री केसरकर म्‍हणाले, मेन राजारामचे स्‍थलांतर करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. या इमारतीची दुरुस्‍ती करायची असेल तर तात्‍पुरती व्यवस्‍था करावी लागेल. तसेच, नवीन बिल्डिंग बांधायची असेल तर त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. मेन राजारामची सद्य:स्‍थिती पाहण्यासाठी शाळेला भेट दिली होती. मुलांना चांगल्या पद्धतीने सुविधा द्यायच्या असतील तर काय करावे लागेल, याबाबत सर्वांशी विचार करून निर्णय घेतला जाईल. शाळेतील विद्यार्थी संख्या, बसण्याची व्यवस्‍था आदी सुविधा कशा पद्ध‍तीने द्यायच्या, त्यासाठीचा होणारा खर्च, गरज असेल तर नवीन इमारत कशी उभी करावी याबाबतचे निर्णय हे लोकांशी चर्चा करूनच घेतले जातील. सध्या स्‍थलांतर करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
.....

स्‍थानिक प्रशासनाला सूचना करणार
‘मेन राजाराम’ स्‍थलांतराबाबत निर्णय झाला नसेल तर प्रशासन जागेचा शोध का घेत आहे, असे विचारले असता पालकमंत्री केसरकर म्‍हणाले, स्‍थानिक प्रशासनाकडून स्‍थलांतराबाबत काहीतरी चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गैरसमज झाला आहे. प्रशासनाला याबाबत सूचना करणार असून लोकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये.