''मेन राजाराम''साठी जनआंदोलनाची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मेन राजाराम''साठी जनआंदोलनाची तयारी
''मेन राजाराम''साठी जनआंदोलनाची तयारी

''मेन राजाराम''साठी जनआंदोलनाची तयारी

sakal_logo
By

लोगो...
....

आज ठरणार आंदोलनाची दिशा

‘मेन राजाराम’प्रश्‍नी आज शाहू स्‍मारकमध्ये सर्वपक्षीय बैठक

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. ७ : भवानी मंडप येथील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्‍कूलच्या स्‍थलांतराच्या घडामोडी सुरू आहेत. प्रशासनाने यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू केला आहे. मात्र, नागरिक, पक्ष, संघटना, राजकीय नेत्यांनी याला कडाडून विरोध केला आहे. ‘मेन राजाराम’ बचावसाठी मंगळवारी (ता. ८) राजर्षी शाहू स्‍मारक भवन येथे सायंकाळी ५ वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस सर्व शाहूप्रेमी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, माजी विद्यार्थी यांनी उपस्‍थित रहावे, असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, रुपेश पाटील यांनी केले आहे.

‘मेन राजाराम’ची पायाभरणी १८७० साली छत्रपती राजाराम महाराज यांनी केली. केवळ शाळेसाठी या इमारतीची उभारणी झाली आहे. हजारो विद्यार्थी या शाळेने दिले आहेत. देशाच्या स्‍वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आणि स्‍वातंत्र्यानंतरच्या देशाच्या प्रगतीत येथील विद्यार्थ्यांचे योगदान आहे. आज या शाळेतील पटसंख्या कमी असली तरी ज्युनियर कॉलेजची पटसंख्या ७५० पेक्षा अधिक आहे. राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्या स्‍मृती या शाळेशी जोडल्या गेल्या आहेत. तरीही या शाळेचे स्‍थलांतर करून ती बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे. पालकमंत्र्यांनी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित असताना एकतर्फी शाळा स्‍थलांतराचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांचा हा निर्णय शाहूप्रेमी कदापिही सहन करणार नाहीत. या विषयावर पुढील निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (ता. ८) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस तमाम कोल्‍हापूरकर, शाहू प्रेमी व माजी विद्यार्थ्यांनी हजर रहावे, असे आवाहन मुळीक यांनी केले आहे.
...

‘स्‍थलांतराऐवजी आधी शिक्षक पुरवा’

अनेकवेळा ‘मेन राजाराम’ची इमारत स्‍थलांतर करण्याचा प्रयत्‍न झाला आहे. ही शाळा कोणातरी उद्योजकाच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोप ‘गोकुळ’चे संचालक व जिल्‍हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती बाळासाहेब खाडे यांनी केला. आजही ग्रामीण भागातील सर्वाधिक मुले ही येथील कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. या शाळेला शिक्षक नसल्याने आज विद्यार्थी संख्या कमी आहे. त्यामुळे शाळा स्‍थलांतर करण्याऐवजी या शाळेला अगोदर शिक्षक पुरवण्याची तरतूद करावी, अशी सूचना खाडे यांनी केली. शाहू स्‍मारक येथील बैठकीत ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी व आजी, माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहनही त्यांनी केले.