मेन राजारामच्या स्‍थलांतराला विरोधच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजारामच्या स्‍थलांतराला विरोधच
मेन राजारामच्या स्‍थलांतराला विरोधच

मेन राजारामच्या स्‍थलांतराला विरोधच

sakal_logo
By

स्‍थलांतराला विरोधच ः पी. एन. पाटील
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ७ : मेन राजारामला ऐतिहासिक पा‍र्श्वभूमी आहे. अशा शाळा टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे या शाळेच्या स्‍थलांतराला आपला ठाम विरोध आहे. तसेच याबाबत आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत चर्चा करून असा निर्णय घेऊ नये, अशी मागणी करणार असल्याची रोखठोक भूमिका आमदार पी. एन. पाटील यांनी घेतली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार पाटील म्‍हणाले, शहरातीलच नव्‍हे तर ग्रामीण भागातील मुलेही या ठिकाणी मोफत शिक्षण घेतात. या शाळेविषयी कोल्‍हापूरकरांना मोठी आस्‍था व आदर आहे. त्यामुळे ही शाळा बंद करणे किंवा स्‍थलांतर करण्याचा कोणी विचार करू नये. याउलट ही शाळा अधिक चांगल्या पद्धतीने कशी चालवता येईल, यासाठी सर्वांसोबत चर्चा करणे आवश्यक आहे. या शाळेचा वारसा जपावा व त्यासाठी शिक्षण विभागाने मदत करावी, यासाठी पालकमंत्री केसरकर यांच्यासोबत चर्चा करणार आहे.