व्हेल माशाची उलटी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हेल माशाची उलटी बातमी
व्हेल माशाची उलटी बातमी

व्हेल माशाची उलटी बातमी

sakal_logo
By

परीख पुलाजवळ व्हेल माशाची उलटी जप्त

सहा महिन्यांतील तिसरी कारवाई, ३ संशयित ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः जिल्ह्यात आठवड्यात दुसऱ्यांदा प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीची तस्करी उघडकीस आली. बाबूभाई परीख पूल ते मध्यवर्ती बस स्थानक रस्त्यावर आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी व्हेल माशाची उलटी नेणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ किलो १५ ग्रॅम वजनाची उलटी जप्त करण्यात आली. याची किंमत सुमारे २ कोटी १ लाख इतकी आहे. जिल्ह्यात सहा महिन्यांत तिसरी तर एका आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.
करण संजय टिपुगडे (२७, रा. राम गल्ली, कळंबा), संतोष अभिमन्यू धुरी (वय ४९, सुभद्रा टावर, लिंशा हॉटेल मागे, कदमवाडी), जाफर सादिक महम्मद बाणेदार( ४०, सुलोचना पार्क,नवीन वाशी नाका) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित असणारी व्हेल माशाची उलटी घेऊन काहीजण शहरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमधून उलटी हस्तगत करण्यात आली. हा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार, विनायक चौगुले, प्रकाश पाटील, हरीश पाटील, संजय हुंबे, नितीन चौथे, संदीप कुंभार, शिवानंद मठपती, रफिक आवळकर यांच्यासह वनाधिकारी रमेश शंकर कांबळे व वनपाल विजय ईश्वर पाटील यांनी केली. यासाठी सायबर पोलिस ठाण्याकडील अमलदार प्रदीप पावरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.