तरुणीचा मोबाईल चोरून पाठवविला अश्‍लिल संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणीचा मोबाईल चोरून 
पाठवविला अश्‍लिल संदेश
तरुणीचा मोबाईल चोरून पाठवविला अश्‍लिल संदेश

तरुणीचा मोबाईल चोरून पाठवविला अश्‍लिल संदेश

sakal_logo
By

तरुणीचा मोबाईल चोरून
पाठविला अश्‍लील संदेश
तरुणाला पोलिस कोठडी; चोरीचे दोन गुन्हे उघडकीस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः तरुणीचा मोबाईल चोरून तिच्या नंबरवरून अश्‍लील संदेश पाठवण्याच्या आरोपावरून तरुणाला आज करवीर पोलिसांनी अटक केली. सागर गोविंद राठोड (वय २५, रा. आंबेवाडी, ता. करवीर, मूळ रा. विजापूर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्याकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाघबीळ घाटात २९ ऑगस्टला एका तरुणीचा मोबाईल अनोखळी तरुणाने चोरला. या मोबाईलमधील सीम कार्ड काढून त्याने दुसऱ्या मोबाईलमध्ये घातले. त्यावरून त्याने संबंधित तरुणीच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर अश्‍लील संदेश पाठवले. याची तक्रार संबंधित तरुणीने करवीर पोलिस ठाण्यात केली होती. त्यावरून पोलिसांनी तपास केला असता हा मोबाईल सागरकडे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने १५ ऑगस्ट दरम्यान कुशिरे गावातून आणखी एक मोबाईल चोरल्याची माहिती पुढे आली. याबाबत कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचेसमोर आले. सागरने आणखी मोबाईल चोरले आहेत का? याचा तपास सुरू आहे. ही करावाई पोलिस निरीक्षक अजय सिकंदर, पोलिस अंमलदार जालिंदर पाटील, सुभाष सरवडेकर, श्रीधर जाधव, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रदीप पावरा यांनी केली.