राजारामपुरीत मारामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजारामपुरीत मारामारी
राजारामपुरीत मारामारी

राजारामपुरीत मारामारी

sakal_logo
By

मारामारी प्रकरणी
दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर ः राजारामपुरी येथील प्रमोद विजय देवकुळे यांना काठीने डोक्यात मारून जखमी करण्यात आले. याप्रकरणी सागर तानाजी साठे आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोघे राजारामपुरी ३ री गल्ली येथे राहतात. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------------
मोरेवाडीत घरफोडी
कोल्हापूर ः मोरेवाडी येथे घराचा कडी कोयंडा उचकटून चोरी झाल्याची घटना आज समोर आली. या प्रकरणी विनायक विश्वनाथ खानविलकर (वय ४९, रा. मोरेवाडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी सुमारे ५२ हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. यामध्ये चार मनगटी घड्याळे आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे.