अप्पर पोलिस अधीक्षकपदी देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अप्पर पोलिस अधीक्षकपदी देसाई
अप्पर पोलिस अधीक्षकपदी देसाई

अप्पर पोलिस अधीक्षकपदी देसाई

sakal_logo
By

61007

जिल्हा अपर पोलिस
अधीक्षकपदी जयश्री देसाई

काकडे यांची फोर्स वन मध्ये बदली.
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांची फोर्सवनमध्ये पदोन्नतीवर अधीक्षक म्हणून बदली झाली. तर जयश्री देसाई या कोल्हापूर जिल्हा अपर पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. देसाई या सध्या रत्नागिरी जिल्हा अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर गडहिंग्लज विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची बदली झाली. गडहिंग्लज विभागाचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून निकेश खाटमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज गृहविभागाकडून जाहीर करण्यात आले.
राज्य पोलिस दलातील ४५ उपायुक्त दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांसह १०९ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी सायंकाळी झाल्या. कोल्हापूर जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक काकडे यांची बदली फोर्सवनमध्ये करण्यात आली. त्यांनी २०१७ मध्ये कोल्हापुरात पदभार स्वीकारला होता. पानसरे हत्येच्या तपासाची मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे होती. २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या काळात त्यांनी जे काम केले त्याबद्दल त्यांना पोलिस महासंचालक उत्कृष्‍ट सेवा पदकही मिळाले होते. त्यांच्या जागी येणाऱ्या जयश्री देसाई या मुळच्या साताऱ्याच्या असून त्या २०११ मध्ये पोलिस उपाधीक्षक म्हणून पोलिस दलात दाखल झाल्या. त्यांनी रयत शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतले आहे.