निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

60949
व्दारकाबाई गवस

व्दारकाबाई गवस यांचे निधन
गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील व्दारकाबाई गणपती गवस (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ९) सकाळी आहे.

61012
लक्ष्मीबाई मोरे
कोल्हापूर : कारदगे पॉईंट, जिवबा नाना जाधव पार्क येथील लक्ष्मीबाई ईश्‍वर मोरे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

61006
विद्याधर शामराव
कोल्हापूर : सिद्धार्थनगर येथील महानगरपालिकाचे निवृत्त कर्मचारी विद्याधर शामराव बनगे (वय ७०) यांचे निधन झाले, त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

60988
नारायण वरेकर
आजरा ः पेरणोली (ता. आजरा) येथील नारायण लक्ष्मण वरेकर (वय १०४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रामतीर्थ गृहतारण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती नारायण वरेकर व हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गटाचे अध्यक्ष कृष्णा नारायण वरेकर यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १०) सकाळी आहे.

60984
बाळकू पोवार
आजरा ः कोवाडे (ता. आजरा) येथील (कै) बाळकू जोती पोवार (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ‘सकाळ’चे भादवण बातमीदार सुभाष पोवार यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ९) आहे.

03123
विठाबाई यादव
राशिवडे बुद्रुक : वाघवडे (ता. राधानगरी) येथील विठाबाई नाऊ यादव (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.

03120
आनंदी बेंडूगळे
राशिवडे बुद्रुक : चाफोडी (ता. राधानगरी) येथील आनंदी दत्तात्रय बेंडूगळे (वय ६६) यांचे निधन झाले. गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर बापूसो बेंडूगळे, विक्रम बेंडूगळे व भोगावती कामगार सोसायटीचे संचालक उत्तम बेंडूगळे याच्या त्या आई होत.

02879
बाळकृष्ण पवार
शाहूनगर : कोल्हापूर येथील आपटेनगर साई कॉलनीतील बाळकृष्ण भिवा पवार (वय ७५) यांचे निधन झाले. ते भोगावती साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी होते. परिते ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अरुण चिले यांचे ते सासरे होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ९) आहे.

02788
गौराबाई प्रभावळे
कळे : येथील गौराबाई शामराव प्रभावळे (वय १००) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १०) आहे.

00824
यशवंत सावंत
सातवे ः येथील यशवंत दत्तू सावंत (वय ९०) यांचे निधन झाले त्यांच्या मागे तीन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ९) आहे.

02017
मालूताई पाटील
हुपरी : येथील शिवाजी चौक परिसरातील मालूताई अण्णासाहेब पाटील (वय ७३) यांचे निधन झाले. मनोज पाटील यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ९) आहे.

04211
हौसाबाई चौगुले
जयसिंगपूर : येथील हौसाबाई जयवंतराव चौगुले (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. माजी नगरसेवक शैलेश चौगुले यांच्या त्या आजी होत.

01521
अनुसया वारके
बिद्री : बोरवडे (ता. कागल) येथील अनुसया आण्णासो वारके (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १०) सकाळी आहे.