कन्या महाविद्यालयात दिव्यांग बांधवांचा रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कन्या महाविद्यालयात दिव्यांग बांधवांचा रोजगार मेळावा
कन्या महाविद्यालयात दिव्यांग बांधवांचा रोजगार मेळावा

कन्या महाविद्यालयात दिव्यांग बांधवांचा रोजगार मेळावा

sakal_logo
By

61043
---------
कन्या महाविद्यालयात
दिव्यांग बांधवांचा रोजगार मेळावा
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मिशन स्वावलंबी अंतर्गत दिव्यांग बांधवांचा रोजगार मेळावा घेण्यात आला. लीला म्हात्रे प्रतिष्ठान (मुंबई) व श्री दत्त दिव्यांग निराधार सेवाभावी संस्था (टाकवडे) यांच्या संयुक्त विद्यमाने मेळाव्याचे आयोजन केले. दिव्यांग लोकांना स्वत:च्या पायावर उभे करणे व त्यांना स्वावलंबी करणे या हेतूने हा मेळावा घेण्यात येतो. दिव्यांग बांधवांना दिव्यांगांनीच बनवलेले आधुनिक कुबडी व अगरबत्ती देऊन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. एन. डी. म्हात्रे, संजय पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्या डॉ. त्रिशला कदम अध्यक्षस्थानी होत्या. रोटरी सेंट्रलचे गव्हर्नर प्रशांत कांबळे यांनी मार्गदर्शन केले. रघुनाथ कुटाळे, अनिल पाटील, राजू पाटील, प्रभाकर पाटील, प्रशांत गुरव आदी उपस्थित होते.
---------
61044
वाढदिनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
इचलकरंजी : कोरोची येथे धनलक्ष्मी परीट या विद्यार्थिनीने वाढदिवस विधायक पद्धतीने साजरा केला. अब्दुललाट येथे बालोद्यान अनाथालयात मुलांना विविध मदत केली. फळांचे वाटप करीत मुलांना लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले. धनलक्ष्मी ही साई क्रीडा मंडळाची खेळाडू असून, तिला या उपक्रमासाठी ऋषीकेश लोहार, अविनाश कोरवी आदींचे सहकार्य लाभले.
--------
61046
‘व्यंकटेश’मध्ये भित्तिपत्रिकेचे प्रकाशन
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयात आविष्कार भित्तिपत्रिकेचे प्रकाशन झाले. प्राचार्य व्ही. ए. माने, उपप्राचार्य डॉ. एन. एम. मुजावर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी स्वातंत्र्यसैनिक व बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे कार्य विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रकाच्या माध्यमातून उलगडले. अमृतमहोत्सवी भारताची यशोगाथा, बदलती भारतीय संस्कृती, वाचन ः काळाची गरज, भारतीय स्वातंत्र्यवीर आदी विषयांवर भित्तिपत्रिका तयार केली. डॉ. एस. एच. आंबवडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. एन. जरंडीकर, प्रा. सौ. एस. एन. बाणदार, प्रा. एम. एस. आंचलिया उपस्थित होत्या. प्रा. डॉ. एस. आर. ठाकर यांनी आभार मानले.
------------
गजानन महाराज मंदिरात दीपोत्सव
इचलकरंजी : संत गजानन महाराज मंदिरात कार्तिक दीपोत्सव झाला. भक्तांकडून लावलेल्या पणतीच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला. त्यानंतर भजन, श्रींची आरती झाली. मंदाताई नवरे यांचे मार्गदर्शन झाले. राजू हिरेमठ, भाऊसो पाटील, अशोक सुतार, उमेश जाधव, महेश गोमेवाडीकर आदी उपस्थित होते.
--------
टाकवडेत आरोग्य शिबिर
इचलकरंजी : टाकवडे (ता. शिरोळ) येथे आरोग्य शिबिर झाले. सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी मठ यांच्या सहकार्याने मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. कुमार पाटील, महेश देवताळे, उमेश संभूशेटे, सुनील पाटील, अनिल पाटील, मोहन माळी, दीपक देसाई, विनायक पाटील, विनायक कुलकर्णी आदी उपस्थित होते.