कुष्‍ठरोगाचे ६४ रुग्‍ण शोधण्यावर ६४ लाखांचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुष्‍ठरोगाचे ६४ रुग्‍ण शोधण्यावर ६४ लाखांचा खर्च
कुष्‍ठरोगाचे ६४ रुग्‍ण शोधण्यावर ६४ लाखांचा खर्च

कुष्‍ठरोगाचे ६४ रुग्‍ण शोधण्यावर ६४ लाखांचा खर्च

sakal_logo
By

६४ कुष्‍ठरोग रुग्ण
६४ लाखांचा खर्च

शोध मोहिमेत १८ दिवसांत ३१ लाख नागरिकांचे सर्वेक्षण

सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ८ : जिल्‍ह्यात आरोग्य विभागाने कुष्‍ठरोग व क्षयरोगाचे सर्वेक्षण केले. केवळ १८ दिवसांत ३१ लाख ४३ हजार ९०६ नागरिकांची आरोग्य तपासणी केल्याचे आरोग्य विभागाचे म्‍हणणे आहे. या सर्वेक्षणासाठी ६४ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. सर्वेक्षणानंतर कुष्‍ठरोगांचे ६४ रुग्‍ण, तर क्षयरोगाचे २२२ रुग्‍ण सापडले. रुग्‍णांच्या उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष रुग्‍ण शोधणे व अनुषंगिक बाबींवरचाच खर्च अधिक होत असल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाकडे स्‍वतंत्र प्रशिक्षण संस्‍था कार्यरत आहे. तसेच सातत्याने विविध सर्वेक्षणाचेही काम सुरू असते. ही सर्व कामे, सर्वे‍क्षण एकाच वेळी करून खर्च व वेळ वाचवणे शक्य आहे का, याचाही प्रयत्‍न करणे आवश्यक आहे.

जिल्‍ह्यात १३ सप्‍टेंबर ते ३० सप्‍टेंबर २०२२ या काळात कुष्‍ठरोग शोधमोहीम व सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबवण्यात आली. यात जिल्‍ह्यातील १२०७ गावांतील २७ लाख ८७ हजार ३७५ लोकांची तपासणी केली, तर नागरी भागातील ३० टक्‍के लोकांची म्‍हणजेच ३ लाख ५६ हजार ५३१ अशा एकूण ३१ लाख ४३ हजार ९०६ लोकांची अवघ्या १८ दिवसांत तपासणी केली आहे. जिल्‍ह्यातील ७ लाख १६ हजार ३४५ कुटुंबांत ही तपासणी केली.
...
चार्ट करणे
रुग्‍णशोध मोहिमेवर झालेला खर्च
सर्वेक्षण मानधन (ग्रामीण)- ४७, ६१३०
सर्वेक्षण मानधन (शहरी)- ३, ८६३६५
प्रशिक्षणासाठी खर्च- ३, २२०४३
तालुकास्‍तयीर प्रचार-‍प्रसिद्धी- ४८,०००
महापालिका प्रचार- ३२,०००
अहवाल छपाई- ८०, ७३१
लॉजिस्‍टीक- २६, ८३७
पर्यवेक्षक मानधन जिल्‍हा- १२,०००
पर्यवेक्षक मानधन तालुका- ३६०००
पर्यवेक्षक मानधन शहरी व इतर- ७, ५१, ४३३
एकूण- ६४, १५३९