वडणगे क्रीडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडणगे क्रीडा
वडणगे क्रीडा

वडणगे क्रीडा

sakal_logo
By

61132
ऋतुजा लांडगे, अंकिता चेचर


वडणगेतील जय किसानच्या
दोघी विद्यापीठ कब्बड्डी संघात

वडणगे, ता. ८ ः अमरावती येथे सुरू असलेल्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी कब्बड्डी स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या महिला कब्बड्डी संघात येथील जय किसान क्रीडा मंडळाच्या खेळाडू अंकिता उत्तम चेचर आणि ऋतुजा सज्जन लांडगे यांची निवड झाली आहे. दोघी कोल्हापुरातील शहाजी महाविद्यालयात बी.ए. भाग-२ मध्ये शिकत आहेत. अंकिता आणि ऋतुजा या उकृष्ट चढाईपटू आहेत. निवडीसाठी त्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य व मंडळाचे अध्यक्ष बी.एच.पाटील, प्रशिक्षक रविंद्र पाटील, शहाजी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत पाटील, प्रा. प्रशांत मोटे, जोतीराम खवरे, सागर देवणे आदी खेळाडुंचे मार्गदर्शन लाभले.