आबिटकर बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आबिटकर बातमी
आबिटकर बातमी

आबिटकर बातमी

sakal_logo
By

‘हायब्रीड ॲन्युटीअंतर्गत मंजूर
रस्त्यांची कामे तत्काळ करा’

कोल्हापूर, ता. ११ ः दळणवळणाच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनाने राबविलेल्या हायब्रीड ॲन्युटीअंतर्गत दोन रस्ते मंजूर असूनही त्याचे काम सुरू झालेले नाही. ही कामे तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. पी. कुंभार यांना केल्या. राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यांतील बांधकाम विभागाच्या प्रलंबित कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.
हायब्रीड ॲन्युटीअंतर्गत निपाणी-देवगड, कूर-शेळेवाडी, परिते ते वाशी असे दोन रस्ते मंजूर आहेत. त्यांचे काम करणाऱ्या कंपनीने कामास केलेल्या दिरंगाईमुळे काम अपूर्ण आहे. हे रस्ते अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना त्रास होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधित कंपनीला रस्त्याची कामे वेळेत करण्यासाठी वेळेची मर्यादा देऊन काम पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याबाबतच्या सूचना कंपनीस द्याव्यात, असे आबिटकर यांनी सांगितले.
राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील तहसील इमारत, प्रातंत कार्यालय, सोळांकूर उपजिल्हा रुग्णालय या इमारतींची कामे तत्काळ सुरू करावीत. आजरा व कसबा तारळे उपजिल्हा रुग्णालय कसबा तारळेचे इमारत बांधकाम अंदाजपत्रक शासनाकडे प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी पाठवावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
माजी उपसभापती अरुणराव जाधव, माजी सरपंच सागर धुंदरे, कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव, उपअभियंता राधानगरी एस. बी. इंगवले, उपअभियंता भुदरगड मिरजकर, अभियंता आजरा राजेंद्र सावंत, उपकार्यकारी अभियंता संजय माने, विजय बलुगडे उपस्थित होते.