जल्लोष ‘गोडसाखर’च्या विजयाचा...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जल्लोष ‘गोडसाखर’च्या विजयाचा...!
जल्लोष ‘गोडसाखर’च्या विजयाचा...!

जल्लोष ‘गोडसाखर’च्या विजयाचा...!

sakal_logo
By

जल्लोष ‘गोडसाखर’च्या विजयाचा...!
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी झाली. उमेदवारांना हुरहुर अन् समर्थकांना उत्कंठा असे मतमोजणी केंद्राच्या आतील आणि बाहेरील चित्र होते. मतमोजणी प्रतिनिधींकडून येणाऱ्या ‘अपडेट’नुसार मतमोजणी केंद्राबाहेरील वातावरण बदलत होते. आपल्या उमेदवाराला मिळालेली आघाडी उन्हाच्या चटक्यातही गारवा देऊन जात होती. समर्थकांचा उत्साह वाढवत होती. याचीच छायाचित्रे टिपली आहेत. ‘सकाळ’चे छायाचित्रकार अमर डोमणे, आशपाक किल्लेदार यांनी.

gad81.jpg
61145
गडहिंग्लज : विजयी आघाडीच्या धुंदीत ट्रिपलसीट आलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करताना पोलिस कर्मचारी.
------------------------------------
gad82.jpg
61147
गडहिंग्लज : सेल्फी तो बनती है... विजयाचा गुलाल अंगावर पडलेला क्षण मोबाईलमध्ये कैद करताना कार्यकर्ते.
------------------------------------
gad84.jpg

गडहिंग्लज : केंद्रनिहाय मतमोजणीमुळे दोनच फेऱ्या झाल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांतही निवांतपणा होता. केंद्राबाहेर निवांत बसलेले ज्येष्ठ कार्यकर्ते.
------------------------------------
gad86.jpg
61152
गडहिंग्लज : विजयाचा आनंदात ज्येष्ठ-कनिष्ठ हा भेद राहत नाही. एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला विजयाचा गुलाल लावताना कार्यकर्ता.
------------------------------------
gad87.jpg
61153
गडहिंग्लज : पहिल्या फेरीत निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर गुलालाची उधळण करीत जल्लोष करताना छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे कार्यकर्ते.
------------------------------------
gad88.jpg
61154
गडहिंग्लज : विजयाच्या जल्लोषात बुलेटच्या सहाय्याने गुलाल उडविताना युवा कार्यकर्ते.